Navneet Rana Sparks Controversy
esakal
एक मौलाना आपल्याला १९ मुलं असल्याचं गर्वाने सांगतो आहे, त्यामुळे आता हिंदूंनाही किमान चार मुलं जन्माला घालावी, असं विधान माजी खासदार तथा भाजपाच्या नेत्या नवनीत राणा यांनी केलं आहे. आज अमरावतीत माध्यमांशी बोलताना त्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली आहे. त्यांच्या या विधानानंतर राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली असून यावर राजकीय प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता आहे. त्यामुळे अमरावतीचं राजकारण पुन्हा तापेल, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.