अचलापूरमधल्या दंग्याला सत्ताधारीच जबाबदार - नवनीत राणा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नवनीत राणा
अचलापूरमधल्या दंग्याला सत्ताधारीच जबाबदार - नवनीत राणा

अचलापूरमधल्या दंग्याला सत्ताधारीच जबाबदार - नवनीत राणा

खासदार नवनीत राणा यांनी आज अमरावतीमधील अचलपूरमधल्या दंगलसदृश परिस्थितीचा आढावा घेतला. अचलपूर पोलीस स्टेशनला त्यांनी भेट दिली. अचलपूरमध्ये जे घडलं ते सामाजिकदृष्ट्या बरोबर नाही, अशी प्रतिक्रिया नवनीत राणा यांनी दिली आहे. त्याचबरोबर महाविकास आघाडीचं सरकार आल्यापासून राज्यातल्या दंगलीत वाढ झाल्याच्या रवी राणा यांच्या विधानाला त्यांनी सहमती दर्शवली आहे.

याविषयी बोलताना नवनीत राणा म्हणाल्या, "मला असं वाटतं की गेल्या १२ वर्षांपासून मीही राजकीय क्षेत्रात आहे आणि त्यात मी जो अनुभव घेतला की असं कधीही झालं नव्हतं. मुंबईत खूप मोठे दंगे झाले होते, तेव्हा आम्ही लहान होतो, पण आई आम्हाला सांगते. पण आज १२ वर्षांनंतर अमरावतीत असं घडणं पचण्यासारखं नाही. कारण अमरावती सगळ्या धर्मांना घेऊन चालणारा जिल्हा आहे. त्याच्यामध्ये अशा प्रकारच्या घटना घडत आहेत. त्यामुळे रवी राणांनी केलेले हे आरोप कुठे ना कुठे बरोबरच म्हणावे लागतील. जेव्हापासून हे सरकार आलंय, तेव्हापासून ते अशाच अँगलने काम करतंय. म्हणून ही सगळी प्रकरणं घडतायत. कारण महाराष्ट्रात आणि माझ्या अमरावतीत असं होणं शक्य नाही कारण हा सगळ्यांना घेऊन चालणारा जिल्हा आहे. त्यामुळे सत्तेत बसलेले जे लोकप्रतिनिधी आहेत, त्यांचा हा दोष आहे".

हेही वाचा: अमरावती दगडफेक प्रकरण : भाजप शिष्टमंडळाला घेतले ताब्यात

मशिदींवरील भोंगे

मशिदींवरील भोंग्यांसदर्भात मोदी सरकारने सगळ्या राज्यांसाठी समान धोरण ठरवून दिलं पाहिजे, अशी मागणी संजय राऊत यांनी केली होती. त्याबद्दल नवनीत राणा यांच्याकडे विचारणा केली असता त्या म्हणाल्या, "तुम्ही अडीच वर्ष त्यांच्यासोबत सत्तेत होता. प्रत्येक निर्णयात तुम्ही सहभागी होता. तेव्हा तुमची अशी प्रतिक्रिया का आली नाही? आता तुम्ही का बोलत आहात? तेव्हा का बोलला नाहीत...तेव्हा सगळं गोड वाटलं मग आता हे कडू का वाटतंय?"

Web Title: Navneet Rana On Achalpur Dispute Mahavikas Aghadi Government

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top