
उद्याच्या बहुमत चाचणीसाठी नवाब मलिक, देशमुखांना कोर्टाची परवानगी
मुंबई : एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर महाविकास आघाडी सरकार अस्थिर झालं आहे, यादरम्यान सुप्रीम कोर्टाने देखील सरकारला दणका दिला असून उद्या महाविकास आघाडी सरकार बहुमत चाचणीला समोरे जावे लागणार आहे. या दरम्यान राष्ट्रवादीचे अटकेत असलेले नेते नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांना या बहुमत चाचणीला उपस्थित राहाण्याची परवानगी सुप्रीम कोर्टाकडून देण्यात आली आहे. (Nawab Malik Anil Deshmukh got Supreme Court Permission To Vote In Maharashtra Floor Test maharashtra politics)
सुप्रीम कोर्टाने तुरुंगात असलेले राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांना उद्या महाराष्ट्र विधानसभेच्या बहुमत चाचणीच्या कामकाजात भाग घेण्याची परवानगी दिली आहे. मात्र नवाब मलिक आणि अनिल देशमुख हे अंमलबजावणी संचालनालय (ED) आणि सीबीआयच्या न्यायालयीन कोठडीत असल्याने, दोन्ही एजन्सींना त्यांना फ्लोर टेस्टमध्ये सहभागी होण्यासाठी विधानसभेत घेऊन जाण्याचे आणि त्यांना पुन्हा न्यायालयीन कोठडीत आणण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
तुरुंगात असलेल्या महाराष्ट्र सरकारमध्ये मंत्री असलेले नवाब मलिक आणि राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दोन्ही नेत्यांनी गुरुवारी महाराष्ट्र विधानसभेत होणाऱ्या फ्लोअर टेस्टला उपस्थित राहण्याची परवानगी मागितली होती.
त्यानंतर सुप्रीम कोर्टाने या दोन नेत्यांना या बहुमत चाचणीला उपस्थित राहण्याची परवानगी दिली आहे. यापूर्वी राज्यसभा निवडणुकीच्या वेळी नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांनी मुंबई उच्च न्यायालयात असाच अर्ज केला होता, मात्र मुंबई उच्च न्यायालयाने नवाब मलिक यांना मतदान करू न देण्याचा सत्र न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला होता.
हेही वाचा: Maharashtra Floor Test : सेनेची शेवटची आशा मावळली, SC चा दणका
Web Title: Nawab Malik Anil Deshmukh Got Supreme Court Permission To Vote In Maharashtra Floor Test Maharashtra Politics
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..