Nawab Malik: फडणवीसांनी अजितदादांना पत्र लिहून त्याची जाहिरात केली कारण...; पृथ्वीराज चव्हाणांचा गंभीर आरोप

नवाब मलिकांना महायुतीत घेण्यास फडणवीसांनी विरोध दर्शवला आहे.
Prithiraj Chavan
Prithiraj Chavan

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते नवाब मलिक यांना महायुतीत घेण्यास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोध केला आहे. याबाबत अजित पवारांना पत्र लिहून आणि ते सोशल मीडियाच्यामार्फत सार्वजनिक केलं.

पण यावरुन आता राजकारण तापलं आहे. काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी यावरुन गंभीर आरोप केले आहेत. (Nawab Malik Devendra Fadnavis letter to Ajit Pawar is for religious polarization serious accusation by Prithviraj Chavan)

मलिकांवर अद्याप आरोप सिद्ध झालेले नाहीत

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, "नवाब मलिक हे महाराष्ट्राचे आमदार आहेत. त्यांच्यावर सरकारनं काही आरोप केले आहेत जे अजून सिद्ध झालेले नाहीत, त्यांना कोर्टाच्या प्रक्रियेतून अद्याप शिक्षा मिळालेली नाही. त्यांना आपला बचाव करण्याची अद्याप संधी मिळालेली नाही. सध्या तुम्ही कुणालाही काहीही आरोप करुन तुरुंगात टाकू शकता, दोन-दोन वर्षापर्यंत तुरुंगात ठेऊ शकता. (Latest Marathi News)

Prithiraj Chavan
NIA Raids : मोठी बातमी! महाराष्ट्रातील ठाणे, पुण्यासह NIAची देशभरात कारवाई; १० दहशतवाद्यांना घेतलं ताब्यात

पत्र सार्वजनिक केलं कारण....

पण नवाब मलिकांना महायुतीत घ्यायचं की नाही हे फडणवीसच ठरवू शकतात कारण युतीतले सर्वात मोठ्या पक्षाचे ते नेते आहेत. आज फडणवीसांच्या मर्जीनं एकनाथ शिंदे मुख्यमंत्री तर अजित पवार उपमुख्यमंत्री बनले आहेत. (Latest Marathi News)

पण एक फोन करुन ते अजित पवारांना सांगू शकत नव्हते का? आम्हाला अडचण आहे, आम्ही मलिकांना सोबत घेऊ शकत नाही. पण नाही तुम्ही पत्र लिहिलं आणि संपूर्ण देशाला ते सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगितलं. का कारण नवाब मलिक यांच्या धर्मामुळं तुम्ही हे केलंत का? असा सवालही चव्हाण यांनी केला आहे.

Prithiraj Chavan
Lashmika Sanjeevan: अवघ्या २४ व्या वर्षी प्रसिद्ध अभिनेत्रीच्या निधनाने हादरली सिनेसृष्टी

धार्मिक ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न

अनेक लोक ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत त्यांना तुम्ही मंत्रिमंडळात घेतलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्यांना २० हजार कोटींचा भ्रष्टाचार केल्याचं प्रमाणपत्र दिलं आहे त्यांना तुम्ही सोबत घेतलं आहे. त्यामुळं मलिकांना भ्रष्टाचाराच्या कारणानं मंत्रिमंडळात घेतलं नाही हे सांगणं बकवास आहे. पण हे पत्र लिहून जाहीर करणं याचा अर्थ तुम्हाला छोट्या छोट्या गोष्टींत ध्रुवीकरण करायचं होतं आणि तुम्ही ते केलं. हे खूपच लाजीरवाणं आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com