
राणेनंतर भाजपच्या ‘या’ नेत्याने अपशब्दात मुख्यमंत्र्यांना खडसावले
नागपूर : राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (nawab malik) यांनी भारताचा मोस्ट वांटेड आतंकवादीकडून प्रॉपर्टी खरेदी केल्याने त्यांचे आतंकवाद्यांसोबत थेट संबंध आहे, हे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा यासाठी भाजपच्या नेत्यांनी लकडगंज पोलिस ठण्यात निवेदन दिले. यावेळी भाजपचे पूर्व नागपूरचे आमदार कृष्णा खोपडे (krushna khopade) यांनी मुख्यमंत्र्यांबद्दल अपशब्द वापरले. नारायण राणेनंतर मुख्यमंत्र्यांबद्दल अपशब्द वापरणारे ते दुसरे नेते आहे. यामुळे राज्यात नवीन वादंग निर्माण होण्याची शक्यता बळावली आहे.
नवाब मलिक यांना ईडीने कोठडीत ठेवले आहे. देशद्रोहाचा गंभीर गुन्हा केल्यानंतरसुद्धा महाविकास आघाडी सरकार त्यांचा राजीनामा घेत नाही आहे. उलट त्यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न करीत आहेत. भाजपच्यावतीने नवाब मलिक यांच्या राजीनाम्यासाठी सर्व सहा विधानसभा मतदारासंघात आजी-माजी आमदार आणि पदाधिकाऱ्यांसह आंदोलन केले. चौकांमध्ये घोषणाबाजी केली.
हेही वाचा: WhatsApp Status : चुकीची कमेंट केल्यामुळे वरातीत गोळीबार; चाकू हल्ला
शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी दाऊद इब्राहिमच्या मागे लागून देश सोडण्यास भाग पाडले. त्याच दाऊदसोबत संबंध ठेवणाऱ्याला उद्धव ठाकरे (uddhav thackeray) वाचवीत (nawab malik) आहेत, असा आरोप करीत कृष्णा खोपडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना धारेवर धरले. देशद्रोहाच्या आरोपात अटकेत असलेल्या मंत्र्याला वाचवण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप खोपडे (krushna khopade) यांनी केला.
राज्याचे मुख्यमंत्री (uddhav thackeray) पद हे एक सांविधानिक पद आहे. परंतु, सत्तेच्या लालसेपोटी भाजप नेत्यांना आपण काय बोलतो कळत नाही. कृष्णा खोपडे यांनी राज्याच्या मुख्यमंत्र्याबद्दल वापरलेले शब्द अतिशय निंदनीय आहे. यापूर्वी नारायण राणे यांनीही मुख्यमंत्र्यांबद्दल आक्षेपार्ह शब्द वापरले होते. यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.
Web Title: Nawab Malik Krushna Khopade Uddhav Thackeray Narayan Rane Nagpur News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..