घुंघट, दुपट्टा आणि हिजाब भारतीय महिलांचा दागिना - नवाब मलिक

Nawab Malik Reaction Karnataka Hijab Row
Nawab Malik Reaction Karnataka Hijab Rowe sakal
Updated on

मुंबई : मंत्री नवाब मलिक यांनी कर्नाटकातील हिजाब प्रकरणावरून (Karnataka Hijab Row) भाजप आणि आरएसएसवर टीका केली आहे. मुस्लीम विद्यार्थिनी शाळेत जात आहेत ही त्यांची समस्या आहे का? शिक्षण घेऊन समाजात आपले स्थान निर्माण करत आहेत? ही त्यांची समस्या आहे का? असे सवाल देखील नवाब मलिकांनी (Nawab Malik) उपस्थित केले आहेत. (Nawab Malik Reaction Karnataka Hijab Row)

Nawab Malik Reaction Karnataka Hijab Row
'बिकिनी असो की घुंघट, तो...' प्रियंका गांधींची हिजाबवरून थेट प्रतिक्रिया

देशात कोणी काय परिधान करायचं हा नागरिकांचा मूलभूत अधिकार आहे. पण, भाजप आणि संघ परिवार लोकांच्या खाणं आणि पेहराव कसा असावा यावर आपलं नियंत्रण ठेवतेय. त्यांच्याकडून मूलभूत अधिकारांवर गदा आणली जात आहे. घुंघट, दुपट्टा आणि हिजाब घालणे हा भारतीय महिलांचा अधिकार आणि दागिना आहे. संघ परिवाराचे लोक हिजाबवरून देशात वाद निर्माण करत आहेत. पण, मुस्लीम विद्यार्थिनी शाळेत जात आहेत ही त्यांची समस्या आहे का? शिक्षण घेऊन समाजात आपले स्थान निर्माण करत आहेत? ही त्यांची समस्या आहे का? असे सवाल देखील नवाब मलिक यांनी उपस्थित केले.

''हिजाबचा अर्थ...'' -

''बेटी पढाओ-बेटी बचाओ'' या घोषणेचं काय झालं? का मुलींना शाळेत बसू दिलं जात नाही. दुपट्टा डोक्यावर घेणं ही भारतीय संस्कृती आहे. कोणालाही चेहरा लपवून शाळेत जायची इच्छा नसते. हिजाबचा अर्थ म्हणजे चेहरा लपवणे नाही. यापूर्वी केरळ न्यायालयानं हिजाब घालण्याची परवानगी दिली होती. आता कर्नाटक न्यायालय काय निर्णय देतं हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. एका मुलीच्या मागे इतक्या विद्यार्थ्यांना सोडले जाते हा नक्कीच गंभीर विषय आहे. हे निषेधार्ह आहे, असंही नवाब मलिक म्हणाले.

''पाकिस्तानच्या मंत्र्यांनी आमच्या देशाबाबत बोलण्याची गरज नाही'' -

पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांनी हिजाब वादात उडी घेतली आहे. त्यावरून देखील मलिकांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांच्या देशातील त्यांनी पाहावी. त्यांच्या देशातील झुंड शाहीकडे त्यांनी लक्ष द्यावं. आम्ही आमच्या देशातील बाबी हाताळण्यासाठी सक्षम आहोत, असं नवाब मलिक म्हणाले. तसेच महाराष्ट्रात देखील हिजाब वादाचे पडसाद उमटताना दिसत आहे. त्यामुळे नागरिकांनी कायदा व सुव्यवस्थेचं पालन करावं आणि पोलिसांच्या परवानगीशिवाय आंदोलन करू नये, असं मलिक म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com