शरद पवारांचे राज ठाकरेंवर टीकास्त्र; म्हणाले.... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Raj Thackeray VS Sharad Pawar

शरद पवारांचे राज ठाकरेंवर टीकास्त्र; म्हणाले....

मुंबई : राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मशिदींवरील भोंगे काढण्यासाठी राज्य सरकारला 3 मे पर्यंतचा अल्टिमेटम दिला आहे. त्यांच्या या इशाऱ्यानंतर राज्यासह देशातील राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे. या सर्वामध्ये राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी राज ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. शरद पवार म्हणाले की, राज ठाकरे जातीधर्माचा वापर करून लोकांना मागे घेऊन जाण्याचा प्रयत्न करत असून, हनुमान चालिसामुळे प्रश्न सुटणार आहेत का? असा प्रश्नदेखील पवार यांनी उपस्थित केला आहे. (Sharad Pawar Criticizes Raj Thackeray )

हेही वाचा: 'संजय राऊत... माझ्या पत्नीची माफी मागा, सोमय्यांकडून मानहानीचा खटला'

लोकांचा आता मुलभूत प्रश्न महागाईचा, रोजगाराचा आणि बेरोजगारीचा असल्याचे पवार म्हणाले. यावेळी पवारांनी राज ठाकरे यांचे नाव न घेता एका नेत्याने माझ्यावर टीका केली की मी फुले आंबेडकर, शाहू महाराज यांचे नाव घेतो. महात्मा फुलेंच नाव मी का घ्यायचे नाही, असा माझा त्यांना प्रश्न आहे. नवनीत राणा आणि रवी राणा यांना आम्हीच पुरस्कृत केले होते. ते निवडून आल्याचे म्हणत त्यांनी लोकांचे प्रश्न सोडवाव्या असे म्हणत काय समस्या आहेत त्या सोडवण्याकडे भर द्या, असे अजित पवार म्हणाले. यावेळी त्यांनी राणा दाम्पत्याच्या मातोश्री समोरील हनुमान चालिसा पठनाचादेखील चांगला समाचार घेतला.

हेही वाचा: भोंगे महत्त्वाचे की महागाई? राज ठाकरेंच्या पत्नी शर्मिला म्हणतात...

मला आणि सुप्रिया सुळेंना हनुमान चालिसा म्हणायची असेल तर, आम्ही घरात म्हणू असे म्हणत त्यांनी राणांवर हल्लाबोल केला. तर, राज ठाकरेंना सत्ता सांभाळता आली नसल्याची बोचरी टीका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी करत वातावरण गढूळ करण्याचं काम राज ठाकरे करत असल्याचे अजित पवार यांनी म्हटले आहे. उत्तर प्रदेशातील भोंगे उतरण्याच्या निर्णयावर बोलताना अजित पवार म्हणाले की, तेथे भोंगे काढले असतील पण, सर्वोच्च न्यायालयाने सकाळी 6 ते रात्री 10 लाऊड स्पिकर लावण्याची परवानगी दिली आहे. त्याशिवाय मुख्य 15 दिवसांसाठी सकाळी 6 ते रात्री 12 पर्यंत लाऊड स्पिकर लवण्याची परवानगी असल्याचे राज ठाकरे यांचे नाव घेता सांगितले.

Web Title: Ncb Leader Sharad Pawar Cirtcism Raj Thackeray On Majjid Speaker

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top