Raj Thackeray wife| भोंगे महत्त्वाचे की महागाई? राज ठाकरेंच्या पत्नी शर्मिला म्हणतात... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Raj Thackeray and sharmila Thackeray
भोंगे महत्त्वाचे की महागाई? राज ठाकरेंच्या पत्नी शर्मिला म्हणतात...

भोंगे महत्त्वाचे की महागाई? राज ठाकरेंच्या पत्नी शर्मिला म्हणतात...

गुढीपाडव्याच्या सभेपासून राज ठाकरे यांची महाराष्ट्रात चांगलीच चर्चा आहे. मशिदीवरचे भोंगे उतरवा अन्यथा त्यासमोर आम्ही दुप्पट आवाजात हनुमान चालिसा लावू अशा आशयाचं विधान राज यांनी केलं होतं. त्या पार्श्वभूमीवर राज्यातलं वातावरण चांगलंच तापलं आहे. भोंग्यांऐवजी राज्यातल्या, देशातल्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा का करत नाही, असं म्हणत अनेकांनी राज ठाकरेंवर टीकाही केली होती. या सगळ्यात राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला यांनीही याविषयीची आपली भूमिका मांडली आहे.

हेही वाचा: राज ठाकरे पुण्यात... पण वसंत मोरे दौऱ्यातून गायब

एबीपी माझा या वृत्तवाहिनीच्या एका कार्यक्रमात बोलताना शर्मिला यांनी विषयी विधान केलं आहे. महागाई महत्त्वाची की भोंगा हे सांगताना शर्मिला ठाकरे म्हणाल्या, महागाई महत्त्वाची आहेच, पण महागाई फक्त राज्य सरकारमुळे होत नाही, तर केंद्र सरकार आणि राज्य सरकार दोघांचेही जीएसटी आणि टॅक्सेसमुळे हातात हात असतात. त्यामुळे महागाईमुळे तर प्रॉब्लेम्स होतातच. पण परवा शिवाजी पार्कवर एक कार्यक्रम होता. पहाटे पाच वाजता जोरजोरात माईक सुरू झाला. मी घाबरले की काय झालं. कर्कश आवाजात सकाळी सुरू झालं.

हेही वाचा: राज ठाकरेंच्या सभेपूर्वीच मनसे नेत्याचं ट्विट; शिवसेनेवर टीका करत म्हणाले...

यावेळी त्यांचं बोलणं मधेच तोडत राज ठाकरेंनी हा किस्सा पूर्ण केला. ते पुढे म्हणाले की, सकाळी पाचपासून लाऊडस्पीकरवर 'हरे रामा हरे कृष्णा' सुरूच होतं. संपेनाच..कितीतरी वेळ तेच सुरू होतं. मग लाऊडस्पीकर बंद केले. समोर हनुमान चालिसा लावावी लागली नाही. आपल्या लोकांना त्याची गरज पडत नाही. मला बांग नाही मारता येत. नाहीतर मी मारली असती.

Web Title: Raj Thackeray Wife Urmila Thackeray About Loudspeakers

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Raj Thackeray
go to top