Nawab Malik: अजित पवार की शरद पवार, कोणासोबत जाणार?; अखेर मलिकांनी स्पष्ट केली भूमिका

नवाब मलिकांची सध्या वैद्यकीय उपाचांसाठी तुरुंगातून जामिनावर सुटका झाली आहे.
Nawab Malik
Nawab Malik

मुंबई : राष्ट्रवादीच्या फुटीनंतर पक्षाचे अनेक बडे नेते हे अजित पवारांसोबत गेले आहेत. त्यातच आता राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते नवाब मलिक यांची नुकतीच जामिनावर सुटका झाली आहे. त्यामुळं आता ते कोणत्या गटात सामिल होणार यावरुन तर्कवितर्क लढवले जात होते. पण आता त्यांनीच स्वतः आपली भूमिका स्पष्ट केली आहे. टाईम्स ऑफ इंडियानं याबाबत वृत्त दिलं आहे. (NCP Ajit Pawar or Sharad Pawar group Nawab Malik clear his stand)

Nawab Malik
Vijay Wadettiwar : भरत गोगावलेंच्या विधानाने सत्तेची साठमारी दिसून आली; वडेट्टीवारांचा हल्लाबोल

मलिकांना नुकताच मिळाला जामीन

न्यायालयीन कोठडीत असताना नवाब मलिकांवर किडनीच्या आजारामुळं रुग्णालयात उपचार सुरु होते. त्यांची प्रकृती ढासाळत असल्यानं वैद्यकीय कारणासाठी सुप्रीम कोर्टानं त्यांना दोन महिन्यांचा जामीन मंजूर केला आहे. जामिनानंतर तीन दिवसांनी मलिकांना मुंबईच्या सिटी केअर रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. यावेळी त्यांच्या स्वागतासाठी राष्ट्रवादीच्या कार्यकारी अध्यक्ष सुप्रिया सुळे या अनेक तास रुग्णालयाबाहेर उपस्थित होत्या. (Latest Marathi News)

Nawab Malik
सरकार पाडू-पाडू म्हणणाऱ्यांचे ज्योतिषी संपले अन् अजित पवार इकडं आले ; एकनाथ शिंदेंचा खोचक टोला

दोन्ही गटांच्या नेत्यांनी केला मलिकांना संपर्क

दरम्यान, अजित पवार गटाचे नेते खासदार प्रफुल्ल पटेल यांनी देखील स्वतः मलिक यांना फोन करुन त्यांची विचारपूस केली होती. तर शरद पवारांसोबत असलेले अनिल देशमुख यांनी त्यांच्या भेटीनंतर प्रतिक्रिया दिली होती. (Marathi Tajya Batmya)

"अजूनही ते आमचे वरिष्ठ सहकारी आहेत. ते लवकर बरे होतील याची मला खात्री आहे, असं देशमुख म्हणाले होते. तसेच अजित पवारांनी देखील मलिकांना फोन करुन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली होती. पण यावेळी आमच्यात कुठलीही राजकीय चर्चा झाली नसल्याचं अजितदादांनी म्हटलं होतं. तसेच शरद पवारांनी देखील मलिकांची फोनवरुन विचारपूस केली होती.

Nawab Malik
Ireland Vs India 1st T20I : हाऊसफुल! जसप्रीतच्या टीम इंडियामुळं आयर्लंड क्रिकेट चांगलंच फायद्यात

मलिकांनी स्पष्ट केली भूमिका

दरम्यान, टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना मलिक म्हणाले की, "मी कुठल्याही गटात जाणार नाही. मी मूळ राष्ट्रवादीसोबत असणार आहे" तसेच मलिकांची कन्या निलोफर मलिक यांनी म्हटलं की, "माझ्या वडिलांसाठी सर्वात प्राधान्याचं काम त्यांच्या प्रकृतीवर लक्ष केंद्रीत करणं असेल. त्यांना आम्ही उत्तम वैद्यकीय सुविधा पुरवू तसेच त्यांना पुन्हा कामासाठी तयार करु"

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com