तो चमत्कार तर घडणारच आहे, पण..; अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं

ncp Ajit pawar statment on magic figure in mlc election 2022  and shivsena ncp mla quota
ncp Ajit pawar statment on magic figure in mlc election 2022 and shivsena ncp mla quota sakal

राज्यात विधान परिषदेची निवडणूकीच्या पार्श्वभूमिवर राजकीय वातावरण तापताना दिसत आहेत, यादरम्यान या विधान परिषदेच्या निवडणूकीसाठी रणनीती ठरली असल्याचे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले आहे. (ncp Ajit pawar statment on magic figure in mlc election 2022 and shivsena ncp mla quota)

अपक्षांना काही लोकांनी फोन केला, संख्या कमी पडत असल्याने अपक्षांना मदतीसाठी फोन केल्याचे पवार यावेळी म्हणाले. पण जे शिवसेनेच्या विचारांचे आहेत त्या आमदारांनी सांगितलं मुख्यमंत्री सांगितल त्यांना आम्ही मतदान करू असे अजित पवारांनी स्पष्ट केलं. केंद्रीय यंत्रणांकडून दबाव टाकला जात असल्याचे आमदारांनी सांगितले नसल्याचेही ते म्हणाले.

अजित पवार यावेळी माध्यमांशी बोलताना सांगितले की, विधान परिषदेच्या निवडणूकीत शिवसेनेकडे मतांचा कोटा आहे, त्यामुळे त्यांचे दोन उमेदवार आरामात निवडून येतील पण राष्ट्रवादीचे दोन नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांची मते बाद झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेसला मात्र अपक्षांच्या मदतीची गरज पडेल, असे अजित पवारांनी सांगितले.

ncp Ajit pawar statment on magic figure in mlc election 2022  and shivsena ncp mla quota
एकनाथ खडसे रामराजेंच्या भेटीला, मतांचा कोटा बदलणार?

अपक्षांना फोन करण्यात आल्याची गोष्ट खरे असल्याचे अजित पवारांनी यावेळी बोलताना सांगितले, ते म्हणाले की अपक्ष आमदार हे पाच-पाच लाख नागरिकांचे प्रतिनिधीत्व करतात त्यामुळे त्यांची मते सन्मानाने मागीतली पाहीजेत असे अजित पवार म्हणाले.

शिवसेनेकडे ५५ मतं आहेत, साधारण ३० चा कोटा दिला तर त्यांचे २ व्यवस्थित निवडून येतील. दोन मत बाद झाल्याने आम्हाला मात्र दोन मत कमी पडतील त्यासाठी अपक्षांना सोबत घेऊन मतांचा कोटा पुरा करण्यासाठी नियोजन सुरू असल्याचे अजित पवार यावेळी म्हणाले.

ncp Ajit pawar statment on magic figure in mlc election 2022  and shivsena ncp mla quota
राजनाथ सिंह आणि उद्धव ठाकरेंच्या फोननंतर सेनेतून पहिली प्रतिक्रिया

चमत्कार उभा महाराष्ट्र बघेल..

पुढे बोलताना त्यांनी सांगितले की, चमत्कार होईल की आणखी काय होईल ते सगळं दिसेलचं. ११ पैकी १० निवडून येणार आहे, एक जण पराभूत होणार आहे, त्यामुळे तो चमत्कार तर घडणारच आहे. आता चमत्कार कुणाच्याबाबतीत घडतोय ते उभा महाराष्ट्र सोमवारी बघेल. सर्व जागा निवडून आणण्याचा प्रयत्न महाविकास आघाडी करते आहे. जे २६ चा आकडा गाठायला कमी पडतील त्याची विकेट जाईल, असंही यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केलं. तुमचे ५५ आणि अपक्ष पाच-सहा असे ६० होतायत. ते सोडून बाकीच्यांना आम्ही फोन केले हे मुख्यमंत्र्यांना आम्ही सांगितंल आहे. त्यानंतर कसा कोटा असावा त्याबद्दल मुख्यमंत्री आदेश देतील असे त्यांनी सांगितले. एकत्र बसून ठरवू असेही ते म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com