राजनाथ सिंह आणि उद्धव ठाकरेंच्या फोननंतर सेनेतून पहिली प्रतिक्रिया

Rajnath Singh Uddhav Thackeray
Rajnath Singh Uddhav ThackeraySakal

राष्ट्रपतीपदाच्या निवडणूक येत्या जुलै महिन्यात पार पडत आहे. यासाठी पहिल्याच दिवशी ११ उमेदवारांनी अर्ज दाखल केले. १८ जुलै रोजी होणाऱ्या निवडणुकीसाठी नामनिर्देशन प्रक्रियेची अधिसूचना बुधवारी जारी करण्यात आली. देशातील सर्वोच्च घटनात्मक पदासाठी उमेदवार २९ जूनपर्यंत अर्ज दाखल करू शकणार आहेत. (Sanjay Raut News)

मात्र त्याआधीच देशात राजकारण तापलं आहे. भाजपविरहित पक्षांच्या बैठका होत असून विरोधकांच्या उमेदवारीवर चर्चा सुरू आहेत. शरद पवार यांच्या नावाना सर्वांचा पाठिंबा आहे. मात्र खुद्द पवारांनी निवडणूक न लढण्याचं स्पष्ट केल्याने समीकरणं आणखी बदलली आहेत. यातच मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी फोन केला होता. त्यानंतर संजय राऊत यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

Rajnath Singh Uddhav Thackeray
सुहास कांदेंचं मत बाद करण्यासाठी मुंबईतून दिल्लीला फोन - संजय राऊत

भाजप देशातील सर्व पक्षांना राष्ट्रपती निवडणुकीसाठी फोन करत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही राजनाथ सिंह यांचा फोन आला होता. देशातील अनेक मोठे नेते राष्ट्रपती पदासाठीच्या निवडणुकीबद्दल बोलण्यासाठी उद्धव ठाकरे यांना फोन करत असल्याचं राऊतांनी सांगितलं.

सर्वसंमतीनं उमेदवार निश्चित झाला तर चांगलंच आहे, असं ते म्हणाले.

महत्वाचे मुद्दे

- मोदी सरकारची प्रत्येक योजना अपयशी

- 10 लाख नोकऱ्या देण्याचा दावा

- सैन्य हा डिस्प्लिन फोर्स

- ठेकेदारीवरती गुलाम मीडिया झाला

- सैन्य हे ठेकेदारी पध्दतीने कामावर घेणं हा भारतीय सैन्याचा अपमान

- गुलामांना ठेकेदारीवर ठेवतात

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com