अजित पवारांच्या पत्नी शिवतीर्थावर, घेतलं राज ठाकरेंच्या बाप्पांचं दर्शन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ncp Ajit Pawar wife Sunetra Pawar at MNS Raj Thackeray house shivtirth to Ganesh visarjan

अजित पवारांच्या पत्नी शिवतीर्थावर, घेतलं राज ठाकरेंच्या बाप्पांचं दर्शन

मुंबई : विरोधीपक्ष नेते अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी जात बाप्पाचं दर्शन घेतलं आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या घरी दीड दिवसांचा गणपती असतो, आज या गणपतीचे विसर्जन करण्यात येणार आहे, यादरम्यान अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी त्यांच्या घरी जात गणरायाचे दर्शन घेतले.

याआधी भाजपचे नेते आणि मुंबईचे भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या घरी जाऊन बाप्पाचे दर्शन घेतले. आशिष शेलार यांनी ट्विट करून राज ठाकरे यांच्या घरी जाऊन बाप्पाचे दर्शन घेतले असल्याची माहिती दिली आहे. ट्विटरवर फोटो शेअर करत त्यांनी ही माहिती दिली आहे.

आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे राज ठाकरे यांची आज सायंकाळी ४ वाजता भेट घेणार असल्याची चर्चा आहे. राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी ही भेट होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. तत्पूर्वी, भारतीय जनता पक्षाचे नेते आणि मुंबईचे भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनी राज ठाकरे यांच्या घरी जाऊन बाप्पाचे दर्शन घेतले. यापूर्वी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीही राज ठाकरे यांची दोन दिवसांपूर्वी भेट घेतली होती.

हेही वाचा: निवडणुकीच्या तोंडावर मनसे भाजपमध्ये खलबतं? शेलारांनी घेतली राज ठाकरेंची भेट

आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर मनसे-भाजप युतीच्या चर्चांना उधाण आलं आहे. मुंबई महापालिका काबिज करण्यासाठी भाजप मनसेसोबत युती करणार असल्याची चर्चाही सुरू आहे. विशेष म्हणजे पुढच्या आठवड्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. त्याआधीच एकनाथ शिंदे हे राज ठाकरेंची भेट घेणार असल्यानं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

हेही वाचा: CM Eknath Shinde | शिवतीर्थावर भेटीचा सिलसिला; CM शिंदे घेणार राज ठाकरेंची भेट?

Web Title: Ncp Ajit Pawar Wife Sunetra Pawar At Mns Raj Thackeray House Shivtirth To Ganesh Visarjan

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..