विधानपरिषद निवडणुकीत तीन मतांची किंमत २१ कोटी - अमोल मिटकरी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

NCP amol mitkari claims 3 mlas received 21 croreslegislative council elections maharashtra mlc election

विधानपरिषद निवडणुकीत तीन मतांची किंमत २१ कोटी - अमोल मिटकरी

मुंबई : एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर राज्यातील वातावरण चांगलेच धवळून निघाले आहे, दरम्यान काही दिवसांपुर्वी झालेल्या विधानपरिषदेच्या निवडणुकीत एका पक्षाचे तीन आमदार २१ कोटी रुपयांमध्ये फुटले असल्याचा खळबळजनक दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी यांनी केला. प्रत्येक आमदाराला ७ कोटी रुपये दिल्याचा आरोप देखील त्यांनी यावेळी केला आहे. या आरोपांमुळ सध्या महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळाच नव्याने चर्चा सुरु झाल्या आहेत. NCP amol mitkari claims 3 mlas received 21 crores in legislative council elections)

पुण्यातील एका कार्यक्रमात बोलताना राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार अमोल मिटकरी म्हणाले की, विधानपरिषदेच्या आता ज्या निवडणुका झाल्या त्यात एका पक्षाचे तीन मते फुटली. ही तीन मते २१ कोटींना फुटली. तीन मते २१ कोटींना फुटली. आपल्या जमिनीची किंमत पाच लाख रुपये आहे आणि चार एकर जमीन विकली तरी २० लाख मिळतील. इथं उमेदवाराला सात-सात कोटी मिळत आहेत. एका-एका उमेदवारासाठी जो घोडाबाजार झाला आहे ना.... हा आरोप आहे मी प्रत्यक्ष तर पाहिलं नाहीये.

हेही वाचा: भाजप प्रवक्त्याकडून सोनिया गांधीबद्दल अपशब्द; कॉंग्रेसची नड्डांकडे तक्रार

आमच्याकडे पण ऑफर आहे या गटाचे आध्यक्ष व्हा, या बदल्यात एक मर्सडिज, दोन लाख रुपये महिना, वर दोन कोटी नगदी घ्या, असेही मिटकरी म्हणाले. यावेळी बोलताना त्यांनी दोन महिन्यापेक्षा जास्त काळ हे सरकार टीकणार नाही असेही यावेळी मिटकरी म्हणाले. राष्ट्रपती राजवट लागेल, त्यानंतर मध्यावधीच्या निवडणूका लागल्या की राष्ट्रवादी पक्ष महाराष्ट्रीतल पहिल्या क्रमांकाचा पक्ष असेल असे देखील मिटकरी यांनी सांगितले.

हेही वाचा: आराम करा, उद्धवजींची सतत आठवण काढू नका; दीपाली सय्यदांचा राज ठाकरेंना टोला

Web Title: Ncp Amol Mitkari Claims 3 Mlas Received 21 Crores Maharashtra Mlc Election

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top