Amol Mitkari: बास्स! पुढचा मार्ग भगतसिंगांचा; महाराजांबद्दलच्या नव्या वादावर राष्ट्रवादीची भूमिका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Amol Mitkari

Amol Mitkari: बास्स! पुढचा मार्ग भगतसिंगांचा; महाराजांबद्दलच्या नव्या वादावर राष्ट्रवादीची भूमिका

मुंबईः छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल एकामागून एक वादग्रस्त विधानं येत आहेत. त्यामुळे राज्यभरात चीड आणि संतापाचं वातावरण आहे. हे कमी की काय भाजप नेते प्रसाद लाड यांनी शिवाजी महाराजांचा जन्म कोकणात झाला, असं विधान केलं आहे. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी स्पष्ट शब्दांमध्ये भूमिका मांडली आहे.

मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या कोकण महोत्सवामध्ये बोलतांना भाजप नेते प्रसाद लाड यांनी शिवाजी महाराजांचा जन्म कोकणात झाला आणि त्यांचं बालपण रायगडावर गेलं, असं विधान केलं होतं. याचा व्हीडिओ राष्ट्रवादीने ट्विट केला.

वास्तविक छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरीवर झाला असून त्यांचं बालपण राजगडावर गेलं, असं स्पष्टीकरण अमोल मिटकरी यांनी दिलं. इतिहासाची मोडतोड करण्याची सुपारी भाजपने घेतली आहे का? असा सवाल उपस्थित करुन इथून पुढे आक्रमक भूमिका घेणार असल्याचं म्हटलं आहे.

''काल आम्ही गांधींगिरी करुन आत्मक्लेष आंदोलन केलं. परंतु आता पुढचा मार्ग भगतसिंगांचा असेल. तुमच्याकडे स्क्रिप्ट असते आणि तुम्ही जाणीवपूर्वक चुकीचं बोलता, हे आता खपवून घेणार नाही'' असा इशारा मिटकरी यांनी दिला.