
राज्यात सत्ता स्थापनेचा पेच कायम असताना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची उद्या (ता.20) बैठक होणार आहे. महाराष्ट्र काँग्रेसचे नेते अहमद पटेल यांची घेणार भेट असून उद्या दिल्लीत होणाऱ्या बैठकीबाबत महाराष्ट्र काँग्रेसच्या नेत्यांमध्ये संभ्रमावस्था असल्याचे सांगण्यात येत आहे.
मुंबई : राज्यात सत्ता स्थापनेचा पेच कायम असताना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची उद्या (ता.20) बैठक होणार आहे. महाराष्ट्र काँग्रेसचे नेते अहमद पटेल यांची घेणार भेट असून उद्या दिल्लीत होणाऱ्या बैठकीबाबत महाराष्ट्र काँग्रेसच्या नेत्यांमध्ये संभ्रमावस्था असल्याचे सांगण्यात येत आहे. राष्ट्रवादीकडून उद्या काँग्रेस राष्ट्रवादी आणि घटक पक्षांची एकत्रित बैठक होणार याची माहितीही देण्यात आली आहे.
'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा
काँग्रेस नेत्यांना मात्र या बैठकीबाबत कुठलेही आमंत्रण देण्यात आले नसल्याची प्राथमिक माहिती आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार ही बैठक उद्या पाच वाजता होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. ही बैठक राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्या निवासस्थानी होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
मुंबई व्हेंटिलेटरवर; 'हे' आहे कारण