esakal | शिवसेना-राष्ट्रवादी करणार सत्ता स्थापन; काँग्रेसला 'या' पदाची अपेक्षा?
sakal

बोलून बातमी शोधा

NCP And Shiv Sena may form government Speculation

काँग्रेस पक्षाला मात्र सत्तेत वाटा मिळणार नसला तरी मात्र, काँग्रेस पक्षाचा माणूस विधानसभा अध्यक्ष व्हावा यासाठी काँग्रेस आग्रही असल्याचे समजत आहे

शिवसेना-राष्ट्रवादी करणार सत्ता स्थापन; काँग्रेसला 'या' पदाची अपेक्षा?

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : महाराष्ट्रात सत्तासंघर्ष हा शिगेला पोहोचलेला असताना कोणाचेही सरकार स्थापन होण्याची शक्यता दिसत नाही. अशातच राष्ट्रवादी आणि शिवसेना मिळून सरकार स्थापन करण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. तर, काँग्रेस पक्षा शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला बाहेरुन पाठिंबा देण्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे. 

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

काँग्रेस पक्षाला मात्र सत्तेत वाटा मिळणार नसला तरी मात्र, काँग्रेस पक्षाचा माणूस विधानसभा अध्यक्ष व्हावा यासाठी काँग्रेस आग्रही असल्याचे समजत आहे. तर शिवसेनेचा मुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उपमुख्यमंत्री होईल. तर, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेला सत्तेत समसमान वाटा मिळण्याचीही शक्यता राजकीय वर्तुळात वर्तविण्यात येत आहे.

भाजपमध्ये उभी फूट; सत्तासंघर्षात दोन मतप्रवाह?

दरम्यान, शिवसेना, राष्ट्रावादी आणि काँग्रेस या तीनही पक्षांना व्हीप काढावा लागणार आहे. विश्वासदर्शक ठारावावेळी तीनही पक्षांचे सर्व सदस्य सभागृहात उपस्थित असतील याची खबरदारी या पक्षाच्या नेत्यांना घ्यावी लागेल. अशावेळी राज्यात भाजपचे संख्याबळ सर्वाधिक असताना मात्र, भाजपच्या सदस्यांना विरोधी बाकावर बसावे लागणार आहे. विरोधी पक्षनेता भाजपचा होईल अशी शक्यता राजकीय वर्तुळातून वर्तविण्यात येत आहे.

loading image