भाजपमध्ये उभी फूट; सत्तासंघर्षात दोन मतप्रवाह?

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 10 November 2019

महाराष्ट्रात सत्तासंघर्ष हा शिगेला पोहोचलेला असताना भारतीय जनता पक्षात उभी फूट पडल्याचे स्पष्ट दिसत आहे. सत्तासंघर्षात सत्तास्थापनेवरून भाजपमध्ये दोन मतप्रवाह पडल्याचे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार समजत आहे. एक गट सरकार स्थापनेच्या बाजूने आहे, तर दुसरा गट अल्पमतातील सरकार स्थापन करु नये, या मताचा आहे.

मुंबई : महाराष्ट्रात सत्तासंघर्ष हा शिगेला पोहोचलेला असताना भारतीय जनता पक्षात उभी फूट पडल्याचे स्पष्ट दिसत आहे. सत्तासंघर्षात सत्तास्थापनेवरून भाजपमध्ये दोन मतप्रवाह पडल्याचे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार समजत आहे. एक गट सरकार स्थापनेच्या बाजूने आहे, तर दुसरा गट अल्पमतातील सरकार स्थापन करु नये, या मताचा आहे.

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

भाजप कोअर कमिटीच्या झालेल्या बैठकीत हे दोन मतप्रवाह पाहायला मिळाले असल्याचे सांगण्यात येत आहे. तरी, भाजप अधिकृत भूमिका काय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागलेलेच असताना भाजप विरोधी बाकांवर बसण्याचा निर्णय जाहीर करण्याची शक्यताही वर्तविण्यात येत आहे.

शिवसेनेला मुख्यमंत्रिपद नाहीच; भाजपने दिला निरोप

दरम्यान, तेराव्या विधानसभेची मुदत शुक्रवारी संपल्यानंतर सत्ता स्थापनेचा तिढा सुटल्याची चिन्हे दिसत नाहीत. राज्यपालांनी सर्वांत मोठा पक्ष असलेल्या भाजपला सत्तास्थापनेसाठी दिलेले निमंत्रणावर आज निर्णय देणे गरजेचे असतानाच भाजपमध्ये दोन मतप्रवाह असल्याचे सुत्रांच्या माहितीनुसार समजत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: split in BJP Two opinion in power struggle