‘मंत्रिमंडळ विस्तारात नव्यांना संधी देण्यासाठी ज्येष्ठांना डावलले गेले, असे सांगण्यात आले. मी सामान्य कार्यकर्ता आहे, माझ्या मतदारसंघातील लोकांशी आणि कार्यकर्त्यांशी बोलेन,’ असे सांगत माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली.