esakal | अजित पवारांना राष्ट्रवादीचा पाठिंबा नाही : शरद पवार
sakal

बोलून बातमी शोधा

Sharad Pawar

अजित पवार यांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय हा वैयक्तिक आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा त्यांच्या या निर्णयाला पाठिंबा नाही. आम्ही परिस्थितीत त्यांना पाठिंबा दिलेला नाही.

अजित पवारांना राष्ट्रवादीचा पाठिंबा नाही : शरद पवार

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : अजित पवार यांच्या राजकीय निर्णयाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पाठिंबा नाही. हा त्यांचा वैयक्तिक निर्णय आहे, असे स्पष्टीकरण राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिले आहे.

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

राजभवनात आज (शनिवार) राज्यपाल भगतसिंग कोशियारी यांनी फडणवीस आणि अजित पवार यांनी शपथ घेतली. राष्ट्रवादी आणि भाजप हे दोन पक्ष एकत्र आल्याचे यावरून तरी दिसत आहे. यावेळी पार्थ पवार, सुनेत्रा पवार राजभवनात उपस्थित होत्या. अजित पवार यांच्यासोबत बुलडाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार डॉ. राजेंद्र शिंगणे हेही उपस्थित होते. शरद पवार यांचा या निर्णयाला पाठिंबा आहे का, असे प्रश्न उपस्थित होत असताना पवारांनी स्पष्टीकरण दिले आहे. 

महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप; देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री, अजित पवार उपमुख्यमंत्री

शरद पवार यांनी म्हटले आहे, की अजित पवार यांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय हा वैयक्तिक आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा त्यांच्या या निर्णयाला पाठिंबा नाही. आम्ही परिस्थितीत त्यांना पाठिंबा दिलेला नाही.

अजित पवारांनी आमच्यासोबत यायचा निर्णय घेतला : फडणवीस