Vidhan Sabha 2019 : शरद पवार म्हणतात, 'अभी तो मै जवान हूँ' (व्हिडिओ)

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 9 ऑक्टोबर 2019

राजकारणात नवी पिढी आणायची आहे, हे आम्ही ठरविले आहे. अभी तो मै जवान हूँ, इनको घर मै ही बिठाऊँगा, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केला.

बाळापूर (अकोला) : राजकारणात नवी पिढी आणायची आहे, हे आम्ही ठरविले आहे. अभी तो मै जवान हूँ, इनको घर मै ही बिठाऊँगा, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केला.

बाळापूर येथील आघाडीच्या उमेदवारीसाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज जाहीर सभा घेतली. यावेळी बोलताना त्यांनी केंद्र व राज्यातील भाजप सरकारवर कडाडून टीका केली. यावेळी पवार यांनी आघाडीच्या उमेदवारांना विजयी करून हे शेतकरी विरोधी सरकारला हटविण्याचे जनतेला आवाहन केले.  

यावेळी बोलताना पवार म्हणाले की, या सरकारने सांगितले की आम्ही कर्जमाफी दिली, खरे पाहता सध्या राज्यातील 31 ट्क्के लोकांचीच कर्जमाफी झाली आहे. 69 टक्के लोकांची कर्जमाफी झालीच नाही. तसेच हे सरकार शेतकरी विरोधी असून यांना यांची जागा दाखवून द्या असे ते म्हणाले. 

 

पुढे बोलताना त्यांनी सांगितले, शेतकऱ्याच्या शेतमालाची किंमत वाढली पाहिजे. हे सरकार मात्र शेतकऱ्यांचे हित पाहत नाही. भाजपच्या राजवटीत कारखानदारी बंद पडली आहेत. तसेच मोदी सरकारच्या 5 वर्षाच्या काळात देशात मोठ्या प्रमाणात बेरोजगारी वाढली आहे. तरुणांच्या हाताला आज काम नसल्याचे पवार म्हणाले. तसेच या सरकारच्या काळात जेट एअरवेज बंद पडली, त्यामुळे 20 हजार जणांचा रोजगार गेला आहे. या सरकारने नोटाबंदी करून लोकांना बँकांच्या दारात उभे केले, यामध्ये 100 च्या वर लोकांचे जीव गेले. अद्यापही नोटाबंदीच्या झटक्यातून देश सावरला नाही, अशी देखील टीका पवार यांनी यावेळी केली. शेवटी बोलताना त्यांनी तेथील उमेदवाराला विजयी करण्याचे आवाहन केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: NCP chief Sharad Pawar criticize BJP government in Akola