वय 80 असले तरी माझी विचार करण्याची पद्धत... : शरद पवार

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 23 फेब्रुवारी 2020

50 वर्षात अनेक घटना घडल्या, अनेक संधी मिळाल्या. एका गोष्टीचं समाधान आहे की कानाकोपऱ्यात मला युवकांशी संपर्क साधण्याची संधी मिळाली. काॅलेजच्या दिवसात अभ्यास सोडून सगळ्यात भाग घ्यायचो. महाविद्यालयाच्या निवडणुका कशा जिंकायच्या यावर विचार करायचो.

मुंबई : माझे वय 80 झाले असले तरी विचार करण्याची पद्धत जुनी नाही. तरुणाईशी संवाद हा आगळा वेगळा कार्यक्रम असून, संवाद साधण्यासाठी मी आलो आहे. मनापासून आनंद आहे आणि तुमची पीढी आणि माझी पीढी याच किती अंतर हे जाणून घ्यायचंय, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसकडून आज (रविवार) तरुणाईशी संवाद या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात शरद पवार यांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना दिलखुलास उत्तरे दिली.  

शरद पवार म्हणाले, की कालची तारीख 22... 52 वर्षांपूर्वी याच दिवशी मी विधानसभेवर आमदार झालो. तुमच्या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी मी आलो. 50 वर्षात अनेक घटना घडल्या, अनेक संधी मिळाल्या. एका गोष्टीचं समाधान आहे की कानाकोपऱ्यात मला युवकांशी संपर्क साधण्याची संधी मिळाली. काॅलेजच्या दिवसात अभ्यास सोडून सगळ्यात भाग घ्यायचो. महाविद्यालयाच्या निवडणुका कशा जिंकायच्या यावर विचार करायचो. माझ्या सार्वजनिक जीवनाची सुरवात झाली ती यामुळेच, मी आजही जुन्या मित्रांना भेटतो. मला असं वाटतं की देशाचं भवितव्य घडवण्याची युवकांमध्ये ताकद आहे. या तरुणांना संधी मिळायला हवी. एकंदर परिस्थिती लक्षात घेतली की लक्षात येतं की नाऊमेद व्हायचं नाही. अभ्यासक्रमामध्ये बदलाची आवश्यकता आहे, अभ्यासक्रमात बदल व्हायला हवा...सुसंवाद असायला हवा. लोकशाहीत काही घडू शकतं. उत्तर प्रदेशात नेते कसे निवडून आले ते पाहा.... चुकीच्या लोकांना बाजूला ठेवायला हवं. माझं स्वच्छ मत आहे आहे की काॅलेजमध्ये निवडणुका पुन्हा सुरू करण्याची काळजी घ्यावी. काॅलेज तरुणांना संधी मिळायला हवी.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: NCP chief Sharad Pawar dialouge with Youths in Mumbai