मराठवाड्यातील दुष्काळ हटविण्यासाठी शरद पवार सरसावले

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 11 January 2020

जयंत पाटील आणि त्या खात्याचे प्रधान सचिव आय. एस. चहल यांच्याकडून दमणगंगा-पिंजाळ नदीजोड प्रकल्प व पार-तापी-नर्मदा नदीजोड प्रकल्प ह्या आंतरराज्य नदीजोड योजनांबाबत सविस्तर माहिती घेतली. 

मुंबई : मराठवाड्यातील दुष्काळ हटविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार सरसावले असून, आज (शनिवार) त्यांनी जलसंपदा मंत्री जयंत पाटील व प्रधान सचिवांची बैठक घेतली. या बैठकीत मराठवाड्याकडे पाणी कसे वळविता येईल यावर सविस्तर चर्चा झाली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

शरद पवार यांनी ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे. तसेच जयंत पाटील म्हणाले, की आज जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक बोलवण्यात आली होती. नाशिकमधून पश्चिमेकडे जाणारे पाणी पूर्वेकडे घेऊन जाण्यासाठी काही वेगळ्या उपाययोजना कश्या करता येईल त्याबाबत आढावा घेण्यात आला. मराठवाड्याला पाणी कसे पुरवता येईल याबाबत बैठक घेण्यात आली. पाणी गोदावरी खोऱ्यात नेण्यासाठी 1980 पासून पश्चिम वाहिनी पूर्वेकडे आणण्यासाठी विचार चालू आहे. या बैठकीला स्वत: शरद पवार होते त्यांनी देखील मार्गदर्शन केले आणि त्यांच्या काही सुचना होत्या त्या देखील त्यांनी केल्या. मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांना कसे सुखी करता येईल याचा आम्ही विचार केला आहे.

पोलिस भरतीसंदर्भात मोठा निर्णय; आता मैदानी चाचणीनंतर लगेच...

तर, शरद पवार यांनी ट्विट करत म्हटले आहे, की जयंत पाटील आणि त्या खात्याचे प्रधान सचिव आय. एस. चहल यांच्याकडून दमणगंगा-पिंजाळ नदीजोड प्रकल्प व पार-तापी-नर्मदा नदीजोड प्रकल्प ह्या आंतरराज्य नदीजोड योजनांबाबत सविस्तर माहिती घेतली. तसेच वैतरणा-उल्हास खोऱ्यांचे अतिरिक्त पाणी गोदावरी खोऱ्यामध्ये सोडून मराठवाडा विभागातील टंचाईग्रस्त भागाकडे कसे वळवता येईल आणि एकूणच टंचाईग्रस्त भागाकडे पश्चिमवाहिनी नद्यांचे अतिरिक्त पाणी वळवून दुष्काळाच्या समस्येवर कायमचा तोडगा शोधण्याबाबत मंत्रिमहोदयांकडे आग्रह मांडला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: NCP chief Sharad Pawar hold meeting with irrigation officers for drought in Marathwada