मी स्वतः ईडी कार्यालयात जाणार : शरद पवार

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 25 September 2019

27 सप्टेंबरला दुपारी दोन वाजता मी स्वतः ईडी कार्यालयात जाणार आहे. ईडीने माझ्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. नेमका काय गुन्हा आहे हे समजून घेईल. डॉ. बाबासाहेब आंबेडरक यांच्या संविधानावर आपला विश्वास आहे. ईडीच्या अधिकाऱ्यांना माहिती देणार आहे. दिल्लीच्या तख्तानुसार महाराष्ट्र झुकणार नाही.

मुंबई : माझ्याविरोधात सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) दाखल केलेला गुन्हा नेमका काय आहे हे समजून घेण्यासाठी मी स्वतः 27 सप्टेंबरला ईडी कार्यालयात जाणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितले.

महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंकेतील आर्थिक गैरव्यवहार प्रकरण सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) आपल्या ताब्यात घेतले असून, 'मनी लॉंडरिंग' प्रतिबंधक कायद्याखाली या प्रकरणाची नोंद केली आहे. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या नावाचा समावेश आहे. 'ईडी'च्या वर्तुळातून मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नावाचा यात समावेश नसला, तरी त्यासंदर्भातील पुष्टीच्या कागदपत्रांमध्ये शरद पवार यांच्या नावाचा उल्लेख आहे आणि इतरही अनेक राजकीय नेत्यांची नावे आहेत. यानंतर राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करण्यात येत आहेत. तर, बारामती बंद ठेवण्यात आली आहे. आज राष्ट्रवादीच्या नेत्यांची मुंबईत बैठक झाली. यानंतर पवार यांनी पत्रकार परिषद घेत ईडीच्या कारवाईबद्दल वक्तव्य केले.

पवार म्हणाले, की 27 सप्टेंबरला दुपारी दोन वाजता मी स्वतः ईडी कार्यालयात जाणार आहे. ईडीने माझ्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. नेमका काय गुन्हा आहे हे समजून घेईल. डॉ. बाबासाहेब आंबेडरक यांच्या संविधानावर आपला विश्वास आहे. ईडीच्या अधिकाऱ्यांना माहिती देणार आहे. मी शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचाराचा व्यक्ती आहे. त्यामुळे मी सहकार्य करणार आहे. महाराष्ट्र हे छत्रपतींचे राज्य आहे. या राज्यातील लोकांवर छत्रपतींचे जे संस्कार झाले आहेत ते दिल्लीच्या तख्तापुढे झुकण्याचे नाहीत. महाराष्ट्र दिल्लीच्या तख्तापुढं झुकणार नाही.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: NCP chief Sharad Pawar reaction after ED case filed in bank scam