esakal | मंत्रिमंडळात कर्तृत्ववान नेत्यांना संधी : शरद पवार
sakal

बोलून बातमी शोधा

Sharad Pawar

ठाणेकरांनी जितेंद्र आव्हाड व एकनाथ शिंदे या दोन कर्तृत्ववान नेत्याना संधी दिली असून गृहनिर्माण व नगरविकास या दोन खात्यांमध्ये जर समन्वय असेल तर संपूर्ण महाराष्ट्राचा चेहरा मोहरा बदलेल.

मंत्रिमंडळात कर्तृत्ववान नेत्यांना संधी : शरद पवार

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कळवा : कळवा-मुंब्रा मतदारसंघात जितेंद्र आव्हाड यांचा या परिसरात केलेल्या विकास कामांमुळे तिसऱ्यांदा विजय झाला असून, महाराष्ट्राच्या राजकारणात त्यांनी स्वतःचे स्थान निर्माण केले आहे. जिथे कर्तृत्व असते तेथे नेतृत्व उभे राहते, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी केले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

कळवा येथील खारीगाव परिसरातील 90 फीट रस्त्यावर आयोजित 'ठाणे फेस्टिव्हल'च्या समारोप प्रसंगी महाराष्ट्र गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या नागरी सत्कार प्रसंगी केले. यावेळी या कार्यक्रमाला शिवसेना नेते संजय राऊत, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे हे आवर्जून उपस्थित होते.

पवार म्हणाले, की ठाणेकरांनी जितेंद्र आव्हाड व एकनाथ शिंदे या दोन कर्तृत्ववान नेत्याना संधी दिली असून गृहनिर्माण व नगरविकास या दोन खात्यांमध्ये जर समन्वय असेल तर संपूर्ण महाराष्ट्राचा चेहरा मोहरा बदलेल. यामुळे महाराष्ट्रातील सर्वसामान्यांना हक्काचा निवारा मिळेल अशी आशा व्यक्त केली. या वेळी त्यांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आठवणीनाही उजाळा दिला. तर या कार्यक्रमात एकनाथ शिंदे यांनी गुरूने केलेला शिष्याचा सत्कार म्हणजे आव्हाड यांचे भाग्य असून पवार यांच्या प्रमाणेच बाळासाहेबांनीही जीव ओवाळून टाकणाऱ्या आमच्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यांना मोठे केले आहे. पवारांच्या व उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाने चांगले काम करत असून 10 रूपयात शिवभोजन, शेतकऱ्यांना 2 लाखांपर्यंत कर्जमाफी या विशेष कामांची माहिती दिली.