esakal | शरद पवारांनी घेतला लशीचा दुसरा डोस; म्हणाले, 'लस घेऊन सक्रिय सहभाग नोंदवा'
sakal

बोलून बातमी शोधा

Sharad Pawar Vaccine

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आज सकाळी कोरोना लशीचा दुसरा डोस घेतला आहे.

शरद पवारांनी घेतला लशीचा दुसरा डोस; म्हणाले, 'लस घेऊन सक्रिय सहभाग नोंदवा'

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आज सकाळी कोरोना लशीचा दुसरा डोस घेतला आहे. याआधी शरद पवार यांनी लशीचा पहिला डोस 1 मार्च रोजी घेतला होता. शरद पवार यांच्यावर नुकतीच एक शस्त्रक्रिया पार पडली आहे. पित्ताशयात खडे झाल्याचं निदान आल्यानंतर त्यांच्यावर ब्रीच कँडी रुग्णालयामध्ये शस्त्रक्रिया पार पडली. त्यानंतर ते घरीच असून विश्रांती घेत आहेत. त्यामुळे शरद पवार यांना लशीचा हा दुसरा डोस त्यांच्या घरीच देण्यात आला. हा डोस देताना त्यांची मुलगी आणि खासदार सुप्रिया सुळे, डॉक्टर तात्याराव लहाने हे देखील उपस्थित होते. याबाबतची माहिती स्वत: शरद पवार यांनीच आपल्या ट्विटरवरुन दिली आहे. तर सुप्रिया सुळे यांनी याचा व्हिडिओ देखील पोस्ट केला आहे. 

शरद पवार यांनी ट्विट करत म्हटलंय की, आज सकाळी कोविड-19 लसीकरणाचा दुसरा डोस घेतला. डॉ. लहाने व त्यांच्या वैद्यकीय पथकाचे तसेच दोन्ही डोस कौशल्याने देणाऱ्या परिचारिका श्रीमती श्रद्धा मोरे यांचे मनापासून आभार!

हेही वाचा - Corona: दुसऱ्या लाटेने मोडले सगळे रेकॉर्ड्स; एका दिवसांत आढळले तब्बल 1.15 लाख रुग्ण

पुढे त्यांनी म्हटलंय की, योगायोगाने आज जागतिक आरोग्य दिन आहे. या निमित्ताने मी सर्व नागरिकांना आवाहन करतो की आपणही कोविड लसीकरणाची प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करून या विषाणूच्या लढाईत सक्रिय सहभाग नोंदवावा.

याआधी शरद पवारांनी 1 मार्चला कोरोना लसीचा पहिला डोस घेतला होता. मुंबईमधील जे. जे. रुग्णालयात जाऊन त्यांनी करोनाची लस घेतली होती.

loading image