NCP Crisis : नेता, पक्ष अडचणीत असताना पळून जाणारे जयंत पाटील नाहीत; संजय राऊतांचे विधान

jayant patil, sanjay raut and sharad pawar
jayant patil, sanjay raut and sharad pawar
Updated on

नवी दिल्ली - राष्ट्रवादी काँग्रेसचे अर्ध्याहून अधिक आमदार अजित पवार गटात सामील झाले आहेत. तर शरद पवार गटासोबत अजुनही काही आमदार कायम आहेत. त्यातच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा महाराष्ट्र दौऱा पार पडला. या दौऱ्यात त्यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासोबत चर्चा झाल्याची चर्चा सुरू आहे. यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

jayant patil, sanjay raut and sharad pawar
Iran : हिजाब परिधान न करणाऱ्या महिलांना मृतदेहांच्या साफसफाईची शिक्षा; इराणचा अजब कारभार

संजय राऊत म्हणाले की, आपला नेता आणि पक्ष अडचणीत असताना पळून जाणारा नेता जयंत पाटील नाहीत. आमचा आणि त्यांचा DNA एक आहे. आम्ही लढणारे आहोत, असंही राऊत म्हणाले.

राऊत पुढं म्हणाले की, या देशात संसद, विधिमंडळ हे उध्वस्त करण्याचं काम सुरू आहे. दिल्लीला पूर्ण राज्य देण्याची घोषणा निवडणुकीत भाजपने दिली होती. तेच भाजप आता अधिकार काढून घेत आहेत. आता सगळा कारभार नोकरशहाच्या हाती देत आहेत.

jayant patil, sanjay raut and sharad pawar
Nashik News : धोंड्यासाठी माहेरी आली लेक मात्र विजेचा धक्का लागल्याने आईसह झाला मृत्यू

राज्यपालांच्या हाती तुम्ही कारभार देणार आहे. राज्यपाल महाराष्ट्र, दिल्ली, हरियाणात दिसतात. बाकी कुठं दिसत नाहीत. आम्ही दिल्ली सेवा विधेयकाला विरोध करणार आहोत, असंही राऊत यांनी स्पष्ट केलं.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत बोलताना राऊत म्हणाले की, त्यांना जास्त सिरीयस घेऊ नका. सध्या एकमेकांवर फुलं उधळण्याचे काम सुरू आहेत. पण त्यांच्यात अंतर्गत काय सुरू आहे हे आम्हाला माहित, असल्याचा टोलाही राऊत यांनी लगावला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com