NCP Crisis : 'दादासमोर नाक उचलून धाकुटी विचारे...'; चाकणकरांचे कवितेतून सुप्रिया सुळेंवर शब्दबाण

रुपाली चाकणकर यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एक कविता पोस्ट केली आहे.
NCP Crisis Rupali Chakankar post on Supriya Sule Ajit Pawar politics marathi news
NCP Crisis Rupali Chakankar post on Supriya Sule Ajit Pawar politics marathi news

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोणाचा यावरून अजित पवार आणि शरद पवार गटामध्ये वाद सुरू आहेत. निवडणूक आयोगात याप्रकरणी सुरू असलेल्या सुनावणीदरम्यान दोन्ही गटाचे नेते एकमेकांसमोर उभे ठाकल्याचे पाहायला मिळत आहे.

शरद पवार गटाकडून सुनिल तटकरे यांना अपात्र करण्याची मागणी केली जात आहे. अजितदादांनी 30 वर्षात बारामती उभी केली. दादा-दादा बोलता-बोलता यांच राजकीय आयुष्य व्यतीत झालं, असा टोला शुक्रवारी अजित पवार गटाचे खासदार सुनिल तटकरे यांनी सुप्रिया सुळेंना लगावला होता. यानंतर आता अजित पवार गटाच्या नेत्या रुपाली चाकणकर यांनी सोशल मीडियावर एक कविता पोस्ट केली आहे. या कवितेतून त्यांनी थेट नाव न घेता सुप्रिया सुळेंवर निशाणा साधला आहे.

रूपाली चाकणकर नेमकं काय म्हणाल्या?

रुपाली चाकणकर यांनी त्यांच्या अधिकृत एक्स अकाउंटवर ही कवीता पोस्ट केली आहे.

तीन टर्म बारामती लोकसभा मतदारसंघात ज्यांच्या जिवावर निवडून येतात त्यांनाच विचारतात प्रश्न...?

दादासमोर नाक उचलून

धाकुटी विचारे

तू कुठं काय केलंस?

चंदनाच्या खोडाला

सहाण विचारे

तू कुठं काय केलंस?

तो झिजला, पण विझला नाही

देहाची कुडीच विचारे

तू कुठं काय केलंस?

पाया भरला, विटा-वासे तोलून धरले

घराचा उंबराच विचारे

तू कुठं काय केलंस?

नांगर धरला, शेती केली

भुईला भीमेचं भान दिलं

मुसक्यांची गाठ विचारे

तू कुठं काय केलंस?

घामाला दाम दिला

कष्टाला मान दिला

रक्ताचं पाणीच विचारे

तू कुठं काय केलंस?

*- प.पा.*

NCP Crisis Rupali Chakankar post on Supriya Sule Ajit Pawar politics marathi news
'हिंडेनबर्ग अहवाल सत्य मानता येणार नाही'; जाणून घ्या अदानी प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले?

राष्ट्रवादी पक्षावरील हक्कासाठी दोन्ही गटाकडून युक्तीवाद केला जात आहे. यादरम्यान शरद पवार गटाकडून देवदत्त कामत यांनी हा अध्यक्ष पदाचा वाद नसून एका गटाला पक्षावर ताबा हवा आहे, त्यासाठी हा कट रचला गेला आहे, असा आरोप करण्यात आला.

तसेच 2019 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाने आघाडी करत निवडणुकीला समोर गेले होते. यामध्ये 54 आणि 44 आमदार विजयी झाले होते. त्यानंतर महाविकास आघाडीची स्थापना करण्यात आली. अजित पवार यांचा पक्ष विस्तारामध्ये कुठलाही हातभार नाही किंवा भूमिका देखील राहीली नाही, असे शरद पवार गटाकडून देवदत्त कामत यांनी सांगितले.

NCP Crisis Rupali Chakankar post on Supriya Sule Ajit Pawar politics marathi news
Ajit Pawar News : 'वाचाळवीरांची संख्या वाढलीय'; अजित पवारांचा रोख कोणाकडे?

आतापर्यंत शरद पवार हेच कायम राष्ट्रीय अध्यक्ष राहिलेले आहेत. त्यांनीच पक्षाचा विस्तार केला. ते निर्विवाद अध्यक्ष राहिले आहेत. त्यामुळं त्यांच्या अध्यक्षपदावर प्रश्न उपस्थित केला जाऊ शकत नाही, सत्तेत सहभागी होण्यासाठी अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर दावा सांगितला आहे असेही शरद पवार गटाकडून सांगण्यात आले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com