"राज्यपाल म्हणाले, शिवरायांबद्दल चुकून बोललो दिलगिरी व्यक्त करतो"; प्रशांत जगतापांची माहिती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Bhagat Singh Koshyari

"राज्यपाल म्हणाले, शिवरायांबद्दल चुकून बोललो दिलगिरी व्यक्त करतो"; प्रशांत जगतापांची माहिती

Bhagat Singh Koshyari: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी केलेल्या एका वक्तव्यामुळं सध्या राज्यातील वातावरण प्रचंड तापलं आहे. राज्यपालांच्या या वक्तव्याचे तीव्र पडसाद सध्या राजकीय वर्तुळात उमटत आहेत.

छत्रपती घराण्याचे वंशज आणि महाविकास आघाडीनं एकमुखानं राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरलीय. तर भाजप नेत्यांनी मात्र राज्यपालांची पाठ राखण केली आहे. राज्यपालांनी कोणतेही वादग्रस्त विधान केलं नाही असं भाजप प्रदेशाध्याक्ष चंद्रशेखर बावनकूळे यांनी सांगितले.त्यामुळे राज्यातील वातावरण तापलं आहे.

दरम्यान राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे एका कार्यक्रमासाठी आज पुण्यामध्ये आले होते. पाषाण येथे असलेल्या अभिमान श्री सोसायटी जवळ राज्यपालांचा निषेध नोंदवण्यात आला.

हेही वाचा- आरामात फेडू शकाल अशीच घ्या कर्जे....

संभाजीराजे छत्रपती यांच्या संघटनेकडून आणि राष्ट्रवादी कडून काळे झेंडे दाखवण्यात आले. राष्ट्रवादीचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या नेतृत्वाखालील एका शिष्टमंडळाने आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. यावेळी शिष्टमंडळाने राज्यपालांना छत्रपती शिवाजी महाराजांवरील तीन पुस्तके भेट दिली.

तर यावेळी राज्यपालांनी दिलगिरी व्यक्त केली असल्याचे प्रशांत जगताप यांनी सांगितलं. शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या विधानावर राज्यपाल म्हणाले "माझ्याकडून चूक झाली. मी दिलगिरी व्यक्त करतो", असा दावा प्रशांत जगताप यांनी केला आहे. त्यामुळे हा वाद आता इथेच थांबतो की अजून चिघळतो पहावा लागणार आहे.

टॅग्स :NCP