NCP अधिवेशनात अजित पवार नाराज? स्पष्टीकरण देताना म्हणाले...

Ajit Pawar
Ajit Pawaresakal
Updated on

नवी दिल्ली : राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे आज दिल्लीत अधिवेशन पार पडले. काल शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी फेरनिवड केली गेली. त्यानंतर राष्ट्रवादी पक्षाचे दिल्लीत अधिवेशन झाले. त्यानंतर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली असून केंद्र सरकारवर निशाणा साधत अनेक मुद्द्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. त्याचबरोबर अजित पवारांना भाषणाची संधी न दिल्यामुळे नाराज असल्याच्या चर्चांना त्यांनी उत्तर दिलं आहे.

(Ajit Pawar Latest News)

दरम्यान, अनेकांचे भाषणं झाले पण अजित पवार यांच्या भाषणाआधी जयंत पाटील यांचं भाषण झाल्यामुळे ते नाराज असल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. ते व्यसपीठावरून निघून गेल्याचंही समोर आलं असून त्यांनी यावर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे. देशभरातून अनेक नेते येथे आले होते. त्यातील महाराष्ट्रातील छगन भुजबळ, जयंत पाटील, सुप्रिया सुळे अशा नेत्यांनी भाषणे केले. त्याचबरोबर केरळमधील आणि लक्षद्वीप येथील खासदाराने भाषण केले. अशा अनेक नेत्यांनी आपले मत मांडले आणि हे काय फक्त महाराष्ट्रातील राष्ट्रवादीचे अधिवेशन नव्हते, हे राष्ट्रीय अधिवेशन असल्यामुळे मी भाषणाबद्दल काही बोललो नाही." असं मत अजित पवार यांनी व्यक्त केलं आहे.

Ajit Pawar
Rain Updates: पुण्यात जोरदार पावसाची हजेरी; राज्यात मुसळधार पावसाचा इशारा

दरम्यान, आज दिल्लीत राष्ट्रवादी पक्षाचे अधिवेशन पार पडले. यावेळी अनेक नेत्यांचे भाषणे झाले पण अजित पवारांच्या आधी जयंत पाटलांना भाषणाची संधी देण्यात आली. त्यानंतर कार्यकर्त्यांना अजित पवारांना भाषणाची संधी द्या म्हणून आवाज केला. तेव्हा अजित पवार व्यासपीठावरून खाली उतरले आणि निघून गेले. तर शरद पवार यांचे भाषण झाल्यावर ते परत व्यासपीठावर उपस्थित होते. त्यामुळे चर्चांना उधाण आलं होतं. त्यानंतर त्यांनी यावर स्पष्टीकरण दिलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Uday Samant Says Maharashtra Will Verify Centre’s Company Closure Data
SpiceJet Delhi Pune Flight Develops Technical Glitch AC Stops Working Leaving Passengers Struggling in Hot Cabin
Maharashtra Rain Alert: Heavy rainfall is likely across Konkan
MLA Kalyanshetti
Marathi News Esakal
www.esakal.com