NCP Dispute: "अंतरिम आदेशाचे काटेकोरपणे पालन करा", सुप्रीम कोर्टाचे राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांना निर्देश!

NCP Dispute: राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यापासून दोन गट निर्माण झाले आहेत. शरद पवार आणि अजित पवार या दोन गटात निवडणूक चिन्हावरुन वाद सुरु आहेत. दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने दोन्ही गटाला महत्वाचे निर्देश दिले आहेत.
NCP Dispute
NCP Disputeesakal

NCP Dispute: राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (NCP) अंतर्गत फुटीशी संबंधित प्रकरणामध्ये, सर्वोच्च न्यायालयाने आज गुरुवारी अजित पवार आणि शरद पवार या दोन्ही गटांना 19 मार्च 2024 रोजी दिलेल्या न्यायालयाच्या मागील अंतरिम आदेशाचे काटेकोरपणे पालन करण्याचे निर्देश दिले. अजित पवार गटाने कोर्टाच्या आदेशाचे पालन केला नसल्याच्या आरोप करत शरद पवार गटाने सर्वोच्च न्यायालयात अर्ज दाखल केला होता.

अजित पवार गटाने देखील शरद पवार गट अजूनही 'घड्याळ' चिन्ह वापरत असल्याचा आरोप केला होता. दरम्यान, शरद पवार गटाला  घड्याळ चिन्ह वापरता येणार नाही. त्यांनी तुतारी वाजवणारा माणसू हे चिन्ह वापरावे. तर अजित पवार गटाने न्यायालयाच्या निर्देशानुसार घड्याळ चिन्ह वापरावे, असे न्यायालयाने म्हटले आहे.

'घड्याळ' चिन्हाचा वापर न्यायप्रविष्ट असल्याबद्दल प्रचार करताना उल्लेख करा. तसेच पत्रके, बॅनर यावर देखील ठळक उल्लेख करावा, असे न्यायालयाने म्हटले आहे.

अजित पवार गटाने  19 मार्च 2024 ला कोर्टाने दिलेल्या आदेशानुसार सर्व वृत्तपत्रांमध्ये जाहिरात दिली होती. मात्र ही जाहीरात कोपऱ्यात असल्याचे कोर्टाच्या निदर्शनास आणून देण्यात आले. त्यामुशे ज्येष्ठ वकील मुकुल रोहतगी यांनी अधिक ठळकपणे सार्वजनिक नोटीस जारी करण्याचे मान्य केले. न्यायालयाच्या आदेशाचा अवमान होणार नाही याची काळजी घेण्यासाठी पदाधिकारी, उमेदवार आणि समर्थकांना सुचना दिल्या जातील असे देखील त्यांनी स्पष्ट केले.

न्यायालयाने शरद पवार गट आणि अजित पवार गट त्यांच्या कार्यकर्त्यांना आणि समर्थकांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन करण्याचे निर्देश दिले आहेत. न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती केव्ही विश्वनाथन यांच्या खंडपीठासमोर दोन्ही गटाच्या अर्जांवर सुनावणी झाली.

आजच्या सुनावणीत काय घडलं?

आजच्या सुनावणीत ज्येष्ठ वकील डॉ. अभिषेक मनु सिंघवी यांनी शरद पवारांची बाजू मांडताना अजित पवार गटाने छापलेल्या काही जाहिराती आणि पोस्टर्स छापील, इलेक्ट्रॉनिक आणि सोशल मीडियावर सादर केल्या. अजित पवार गटाने सुप्रीम कोर्टाने 'घड्याळ' चिन्ह वापरण्याची परवानगी दिल्याचा दिशाभूल करणारा दावा केला.

न्यायालयाने घड्याळ चिन्हाचा वापर हे न्यायप्रविष्ठ असल्याचा ठळक उल्लेख करण्याच्या सुचना अजित पवार गटाला दिल्या होत्या. मात्र अजित पवार गटाच्या ट्विटर अकाऊंवर देखील थेट घड्याळ चिन्हा वापरल्या जाते, असे अभिषेक मनु सिंघवी म्हणाले.

तर ज्येष्ठ वकील मुकुल रोहतगी यांनी अजित पवारांची बाजू मांडत, शरद पवार गट घड्याळाचे चिन्ह वापरत असल्याचा आरोप केला आणि न्यायालयाने राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) यांनी दिलेले नाव वापरत नाही, असे आरोप केला.

दरम्यान खंडपीठ पूर्वीच्या आदेशात बदल करणार नसल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले. न्यायमूर्ती सूर्यकांत म्हणाले की, काही नियमांचे पालन करूनही न्यायालय कोणत्याही पक्षाच्या प्रामाणिकपणावर शंका घेत नाही. तळागाळातील अडचण आम्हाला समजते, परंतु तुमच्या पदाधिकाऱ्यांनी समजून घेतले पाहिजे.

NCP Dispute
Nandurbar Lok Sabha Election : 9 हजार ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग मतदार करणार घरबसल्या मतदान!

19 मार्चला दिलेले निर्देश कोणते?

19 मार्च रोजी न्यायालयाने अजित पवार गटाला वरील अटींसह घड्याळ चिन्ह वापरण्याची परवानगी दिली. यानंतर, काल (03 एप्रिल) शरद पवार गटाने तातडीचा ​​उल्लेख करत, अजित पवार गटाने 19 मार्चच्या निर्देशाचे पालन केले नसल्याचा आरोप करत न्यायालयात धाव घेतली.

हे पाहता सर्वोच्च न्यायालयाने अजित पवार गटाला 19 मार्चच्या न्यायालयाच्या आदेशानंतर किती जाहिराती प्रसिद्ध झाल्या हे दाखवण्यास सांगितले होते . एवढेच नाही तर न्यायालयाने तोंडी असेही म्हटले होते की, आपल्या आदेशाचा जाणीवपूर्वक चुकीचा अर्थ लावण्याचा अधिकार कोणालाही नाही आणि न्यायालयाच्या आदेशाची अवहेलना केल्यास त्याची गंभीर दखल घेतली जाईल.

NCP Dispute
Eknath Khadse: तावडे, मुंडेंनंतर खडसेंचे होणार भाजपमध्ये पुनर्वसन? पवारांना डच्चू देण्याची चर्चा का झाली सुरू...

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com