आता पंकजा मुंडेनाचा निर्णय घ्यायचाय, एकनाथ खडसेंच सूचक विधान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ncp eknath khadse statement on bjp leader pankaja munde amol mitkari join in nashik

आता पंकजा मुंडेनाचा निर्णय घ्यायचाय, एकनाथ खडसेंच सूचक विधान

शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर भाजपमध्ये नाराजीनाट्य रंगल्याच्या चर्चा सुरू होत्या, यादरम्यान राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांनी भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांना राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात येण्याची ऑफर दिली होती, यामुळे पंकजा मुंडे राष्ट्रवादीत प्रवेश करणार का अशा चर्चा सुरू झाल्या होत्या. या राजकीय चर्चेत आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी उडी घेत भाष्य केलं आहे.

भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना भाजपकडून सतत डावलले जात असताना त्या राष्ट्रवादीत येतील का? असे विचारले असता खडसे म्हणाले, पंकजा मुंडे या गोपीनाथ मुंडेंच्या कन्या आहेत. त्यांनी वर्षानुवर्षे भारतीय जनता पार्टीच्या विस्तारासाठी काम केलं आहे. असं असताना पंकजा मुंडे यांच्यावर भाजपामध्ये अन्याय होत आहे, अशी भावना सातत्याने जनतेमध्ये आणि त्यांच्या चाहत्यांमध्ये आहे. त्यामुळे पंकजा मुंडे अस्वस्थ आहेत, अशा प्रकारच्या बातम्याही येतात, असे ते म्हणाले.

पुढे बोलत्याना खडसे म्हणाले की, पंकजा मुंडे भाजपमध्ये अस्वस्थ असल्यामुळेच स्वाभाविकपणे अमोल मिटकरी यांनी पंकजा मुंडे यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येण्याचं आवाहन केलं. राष्ट्रवादीत यायचं की नाही? हा निर्णय पंकजा मुंडे यांनी घ्यायचा आहे. पण त्यांनी वर्षानुवर्षे भाजपचं काम केलं आहे. त्यामुळे त्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा विचार करतील, असं मला वाटतं नाही. असे एकनाथ खडसे म्हणाले आहेत.

हेही वाचा: कंन्फर्म! लवकरच येतोय Redmi चा सर्वात स्वस्त 5G फोन; 'या' तारखेला होईल लॉन्च

दरम्यान काही दिवसांपूर्वी पंकजा मुंडेंना ऑफर देताना राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी म्हणाले होते की, गोपीनाथ मुंडे, एकनाथ खडसे यांच्या पुण्याईनं भाजप पक्ष वाढला. पण त्यांच्याच मुलीचा पराभव करण्यात आला. रोहिणी खडसेंना हे लवकर कळलं. पंकजांनाही ते कळायला हवं. आता १२ आमदारांची यादी राज्यपाल जाहीर करतील, त्यात पंकजांचं नाव नाही. पक्ष वाढवणाऱ्यांचे पंख भाजपा कसे छाटतो हे यावरुन दिसतं. रोहिणी खडसे राष्ट्रवादीत आल्या, तसंच पाऊल पंकजा मुंडेंनीही उचलावं. मिटकरींच्या या ऑफरमुळे राजकीय वातावरणात पंकजा मुंडे भाजप सोडणार का? यावरून राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाल्या होत्या.

हेही वाचा: नोकियाचा नवीन Nokia 2660 Flip फीचर फोन लॉंच, जाणून घ्या किंमत-फीचर्स

Web Title: Ncp Eknath Khadse Statement On Bjp Leader Pankaja Munde Amol Mitkari Join In Nashik

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..