राज्यसभेसाठी छगन भुजबळांचा पत्ता कट? जागेसाठी राष्ट्रवादीत नव्या 'या' ४ नावांची चर्चा; महायुतीचा '१२-३-२' फॉर्म्युला काय?

NCP Rajya Sabha Race: राष्ट्रवादीच्या राज्यसभा शर्यतीतून छगन भुजबळांना वगळण्यात आले आहे. ३-४ नावांवर चर्चा सुरू आहे. महायुतीने विधान परिषदेसाठी १२-३-२ हा फॉर्म्युला निश्चित केला आहे.
NCP Rajya Sabha Race

NCP Rajya Sabha Race

ESakal

Updated on

महाराष्ट्रातील रिक्त राज्यसभा जागांसाठी महायुतीमध्ये डावपेचांचे गणित सुरू झाले आहे. अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोट्यात येणाऱ्या जागेवरून पक्षात अंतर्गत संघर्ष स्पष्टपणे दिसून येत आहे. ज्येष्ठ नेते छगन भुजबळ बऱ्याच काळापासून या जागेवर आपला दावा सांगत होते. परंतु पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या नुकत्याच झालेल्या बैठकीने त्यांच्या योजनांवर पाणी फेरले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com