राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची यादी फिक्स; मित्रपक्षाला आपल्या कोट्यातून मंत्रिपद

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 29 डिसेंबर 2019

राष्ट्रवादीच्या कोट्यातून मित्रपक्षालाही संधी देण्यात येणार असल्याचे बोलले जात असून स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी हेदेखिल कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेणार असल्याचे निश्चित झाले आहे.

मुंबई : राज्य मंत्रिमंडळ विस्ताराला येत्या सोमवारचा (30 डिसेंबर) मुहूर्त मिळाला असून राष्ट्रवादी काँग्रेसचे यामध्ये १२-१३ मंत्री शपथ घेण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या मंत्रिमंडळात कोणाला संधी मिळणार, याकडं संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलं आहे. यामध्ये पक्षाचे नेते अजित पवार यांच्यासह धनंजय मुंडे आणि इतर नेते शपथ घेतील.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

राष्ट्रवादीच्या कोट्यातून मित्रपक्षालाही संधी देण्यात येणार असल्याचे बोलले जात असून स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी हेदेखिल कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेणार असल्याचे निश्चित झाले आहे.

मंत्री पदाच्या राष्ट्रवादीच्या 'या' नावांवर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती
कॅबिनेट मंत्री

  • अजित पवार
  • दिलीप वळसे-पाटील
  • अनिल देशमुख
  • जितेंद्र आव्हाड
  • नवाब मलिक
  • हसन मुश्रीफ
  • बाळासाहेब पाटील
  • धनंजय मुंडे
  • डॉ. राजेंद्र शिंगणे
  • राजू शेट्टी

राज्यमंत्री

दरम्यान, ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराचा भव्य शपथविधी सोहळा होणार सोमवारी होणार आहे. मंत्रिमंडळ विस्तरासाठी विधान भवनाच्या प्रांगणात होणाऱ्या शपथविधीला साधारण 6000 लोकांच्या आसनांची तयारी करण्यात येत आहे, त्यासाठी मंडप तयार करण्यात येत आहे. प्रांगणात 15 एलईडी स्क्रीन लावण्यात येणार आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: NCP Fix list of ministers Tomorrow oath Program