esakal | अजित पवारांना गृह तर धनंजय मुंडेना मिळणार 'हे' खाते
sakal

बोलून बातमी शोधा

Ajit Pawar as home Minister and Dhananjay Munde as Irrigation minister

अजित पवारांना गृह तर धनंजय मुंडेना मिळणार 'हे' खाते

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : राज्य मंत्रिमंडळ विस्ताराला येत्या सोमवारचा (30 डिसेंबर) मुहूर्त मिळाला असून राष्ट्रवादी काँग्रेसचे यामध्ये १२ मंत्री शपथ घेण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या मंत्रिमंडळात कोणाला संधी मिळणार, याकडं संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलं आहे. यामध्ये पक्षाचे नेते अजित पवार आणि विधानपरिषदेचे माजी विरोधीपक्षनेते धनंजय मुंडे यांना मंत्रिपद मिळणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

अशातच अजित पवार आणि धनंजय मुंडे यांची मंत्रिमंडळात वर्णी लागली असल्याचे बोलले जात असून अजित पवारांकडे गृह तर धनंजय मुंडे यांच्याकडे जलसंपदा आणि पाटबंधारे खात्याची जबाबदारी सोपविण्यात येणार असल्याचे बोलले जात आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे अर्थ तर माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्याकडे ग्रामविकास खात्याची जबाबदारी सोपविण्यात येणार असल्याचे निश्चित झाले आहे. सोबतच, जितेंद्र आव्हाड, दिलीप वळसे पाटील, अनिल देशमुख, राजेश टोपे, दत्ता भरणे आणि अदिती तटकरे आदी आमदार मंत्री शपथ घेणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

पुण्याला मिळणार तीन मंत्रिपदं? अजित पवारांचे नाव निश्चित, तर पालकमंत्री पदी

दरम्यान, ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराचा भव्य शपथविधी सोहळा होणार सोमवारी होणार आहे. मंत्रिमंडळ विस्तरासाठी विधान भवनाच्या प्रांगणात होणाऱ्या शपथविधीला साधारण 6000 लोकांच्या आसनांची तयारी करण्यात येत आहे, त्यासाठी मंडप तयार करण्यात येत आहे. प्रांगणात 15 एलईडी स्क्रीन लावण्यात येणार आहेत.
 

अमृता फडणवीस यांना शिवसेनेचे प्रत्युत्तर

दरम्यान, पुणे जिल्ह्यात कोणाच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडणार, याची उत्सुकता सर्वाधिक आहे. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी जिल्ह्याला तीन मंत्रिपदे मिळावीत, अशी शिफारस पक्षाकडं केल्याचं वक्तव्य काही दिवसांपूर्वी केलं होतं. ते मंत्री कोण? याकडं सगळ्यांचं लक्ष लागलं असलं तरी स्वतः अजित पवार, दिलीप वळसे पाटील यांची नावे जवळपास निश्चित आहेत. अशातच इंदापूरचे आमदार दत्ता भरणे यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे.