NCP: राष्ट्रवादीला मोठा धक्का! राष्ट्रवादीचे बडे नेते शिंदे गटाच्या मार्गावर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ncp

NCP: राष्ट्रवादीला मोठा धक्का! राष्ट्रवादीचे बडे नेते शिंदे गटाच्या मार्गावर

राज्यात शिंदे फडणवीस सरकार स्थापन झाल्यापासून शिंदे गटात इनकमिंग सुरूच आहे. ठाकरे गटातील शिवसेना फुटून एकनाथ शिंदे गटासोबत जात असल्याचे दिसत आहे. दरम्यान आता शिंदे गटाकडून राष्ट्रवादीला खिंडार पाडण्याचे काम सुरू आहे.

हेही वाचा- Gautami Patil Lavani: गौतमीची लावणी कुठे चुकतेय?

हेही वाचा: Bullock Cart Races : बैलगाडा शर्यतींना पुन्हा खीळ बसणार? सुप्रीम कोर्टात लवकरच महत्वाची सुनावणी

राष्ट्रवादीचे वैजापूर मतदार संघातील माजी आमदार भाऊसाहेब चिकटगावकर पक्ष सोडण्याच्या तयारीत आहेत. आज पक्ष सोडण्याबाबत भूमिका जाहीर करणार आहेत. चिकटगावकर 2019च्या विधानसभा निवडणुकीपासून पक्ष सोडणार असल्याच्या चर्चा होत्या.

मात्र भाऊसाहेब चिकटगावकर यांच्या पक्ष सोडण्याच्या शक्यतेने खळबळ निर्माण झाली आहे. त्याबरोबर सोलापूर राष्ट्रवादीचेनेते आणि माजी उपमहापौर दिलीप कोल्हे आज शिंदे गटामध्ये प्रवेश करणार आहे. त्यामुळे राष्ट्रवादीला हा मोठा धक्का मानला जात आहे.

शिंदे गटाकडून सोलापूरमध्ये शिवसेनेला आणि राष्ट्रवादीला धक्क्यावर धक्के दिले जात आहेत. दिलीप कोल्हे हे शरद पवारांचे अत्यंत विश्वास मानले जात होते. कोल्हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आज शिंदे गटामध्ये प्रवेश करणार आहे.

संध्याकाळी सात वाजता वर्षा निवासस्थानी हा प्रवेश होणार आहे. जिल्ह्यातील स्थानिक नेतृत्वांना कंटाळून दिलीप कोल्हे यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान गेल्या काही दिवसांपुर्वी राष्ट्रवादीतून शिंदे गटात प्रवेश करणारे राष्ट्रवादी मधील आठ जणांना जयंत पाटलांनी सांगलीत बोलावून घेतलं. आणि शिंदे गटात जाऊ नका,अशी मनधरणी करत आठ जणांचा शिंदे गटातील प्रवेश रोखला होता.