Maharashtra Politics: 'राष्ट्रवादीची भाजपसोबत बोलणी सुरू', काँग्रेसच्या जेष्ठ नेत्याचा गौप्यस्फोट

राष्ट्रवादी काँग्रेसची भाजपसोबत बोलणी सुरू आहेत, असा गौप्यस्फोट काँग्रेसच्या जेष्ठ नेत्याने केला आहे
amit shah & sharad Pawar
amit shah & sharad PawarEsakal

राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. महाविकास आघाडीच्या बळकटीसाठी एकीकडे महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा सुरू असतानाच काँग्रेसच्या बड्या नेत्याने मोठा गौप्यस्फोट केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची भाजपसोबत बोलणी सुरू असल्याचं पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हंटलं आहे. कर्नाटकातील निपाणी मतदारसंघात प्रचारादरम्यान त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. या मतदारसंघात काँग्रेस उमदेवाराविरोधात राष्ट्रवादीने उमेदवार दिला आहे, त्यामुळे पृथ्वीराज चव्हाण यांनी राष्ट्रवादीवर निशाणा साधला आहे.

पृथ्वीराज चव्हाण बोलताना म्हणाले कि, 'राष्ट्रवादी काँग्रेसने इकडे उमेदवार उभा केला आहे. तिकडे ते आमच्यासोबत आहेत, किती दिवस असतील माहिती नाही. कारण भाजपसोबत त्यांची रोज बोलणी चालली आहेत. रोज पेपरमध्ये बातमी येते, कोण नेता जाणार. त्यांनी काय निर्णय घ्यायचा त्यांचा त्यांनी घ्यावा', असंही पृथ्वीराज चव्हाण म्हणाले आहेत.

amit shah & sharad Pawar
Mohit Kamboj : 'त्या' बारमध्ये मोहित कंबोज नेमके कशासाठी गेले होते?; पत्रकार परिषेद स्वतः केला खुलासा

'राष्ट्रवादीचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा होता तो रद्द झाला आहे. त्यांना इतर राज्यांमध्ये मतं मिळाली नाहीत, म्हणून निवडणूक आयोगाने त्यांच्या पक्षाचा राष्ट्रीय दर्जा काढून टाकला आहे. इतर राज्यांमध्ये जाऊन मतांची टक्केवारी वाढली तर पुन्हा आपल्याला कदाचित राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळेल म्हणून टक्केवारीसाठी निवडणूक आहे. भाजपची टक्केवारीची निवडणूक वेगळी आहे, राष्ट्रवादीची वेगळी आहे', असा खोचक टोलाही पृथ्वीराज चव्हाण यांनी राष्ट्रवादीला लगावला आहे.

amit shah & sharad Pawar
Sharad Pawar : "उद्धवदेखील सक्रिय होते परंतु.." कोरोना काळात मविआ सरकारच्या कामगिरीचे श्रेय पवारांनी दिले 'या' नेत्याला

अजित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक आमदारांसह भाजपसोबत सत्तेत सहभागी होणार असल्याच्या चर्चा काही दिवसांपूर्वी समोर आल्या होत्या. या चर्चा वारंवार सुरू झाल्यानंतर अजित पवार यांनी स्वत: समोर येऊन आपण जीवात जीव असेपर्यंत राष्ट्रवादीमध्येच राहणार असल्याचं म्हंटलं होतं, यानंतर त्यांनी वज्रमूठ सभेतूनही सरकारवर टीका केली आहे. आता पृथ्वीराज चव्हाण यांनी हे वक्तव्य केल्यामुळे पुन्हा एकदा या चर्चांना उधाण आलं आहे.

amit shah & sharad Pawar
पहाटेचा शपथविधीनंतरही पवारांनी अजित पवारांना माफ कसं केलं? आत्मचरित्रात मोठा खुलासा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com