'राष्ट्रवादीच्या आमदारांना उदयनराजेंचा फोटो मेसेज करुन ठेवलाय'

सकाळ वृत्तसेवा
Friday, 8 November 2019

काँग्रेस आणि शिवसेना आपल्या आमदारांना अज्ञातस्थळी हलविण्यात येत असताना राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्या आमदारांना कुठेही नेलेलं नाही. याच मुद्द्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेस आमदार जितेंद्र आव्हाड यांनी भाजपमध्ये प्रवेश करणारे आणि सातारा लोकसभा पोटनिवडणुकीत पराभूत झालेले उदयनराजे भोसले यांच्यावर निशाणा साधला आहे. त्यांनी मिश्किल ट्वीट करत म्हटलं आहे की, उदयनराजेंचा फोटो सर्व आमदारांना मेसेज करून ठेवला आहे.

मुंबई : काँग्रेस आणि शिवसेना आपल्या आमदारांना अज्ञातस्थळी हलविण्यात येत असताना राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्या आमदारांना कुठेही नेलेलं नाही. याच मुद्द्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेस आमदार जितेंद्र आव्हाड यांनी भाजपमध्ये प्रवेश करणारे आणि सातारा लोकसभा पोटनिवडणुकीत पराभूत झालेले उदयनराजे भोसले यांच्यावर निशाणा साधला आहे. त्यांनी मिश्किल ट्वीट करत म्हटलं आहे की, उदयनराजेंचा फोटो सर्व आमदारांना मेसेज करून ठेवला आहे.

राज्यात सत्तासंघर्ष हा टोकाला पोहोचलेला असून अद्यापही सत्तास्थापनेचा तिढा सुटलेला नाही. अशावेळी आमदारांना फोडण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा गंभीर आरोप आघाडीकडून होत असताना आमदार फुटू नयेत यासाठी एकीकडे शिवसेनेने  आमदारांना रंगशारदा हॉटेल तर काँग्रेसने आपल्या आमदारांना जयपूरला हलवलं आहे.

या स्टार्सचं पहिलं काम, पहिला पगार तुम्हाला माहितीय?

जितेंद्र आव्हाड यांनी व्हायरल झालेला एक मेसेज ट्विट करत उदयनराजे भोसलेंना टोला लगावला आहे. शिवसेना आमदार–रंगशारदा, काँग्रेस आमदार-जयपूर, राष्ट्रवादी आमदार-आपआपल्या घरी, कारण सगळ्यांना उदयनराजेंचा फोटो मेसेज करून ठेवलाय. हा मेसेज करणाऱ्याला सलाम असं ट्विट जितेंद्र आव्हाडांनी केलं आहे.

पुणे : भांडणं दहीहंडीवेळची अन् त्या चौघांनी आता राग काढला!

विधानसभा निवडणुकीच्या आधी उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत भाजपात प्रवेश केला होता. विधानसभा निवडणुकीसोबत साताऱ्यातील लोकसभेची पोटनिवडणुकही पार पडली. या निवडणुकीत उदयनराजे भोसले यांचा राष्ट्रवादीचे उमेदवार श्रीनिवास पाटील यांनी धक्कादायक पराभव केला. त्यामुळेच बंडखोरी करणाऱ्या आमदारांची परिस्थिती उदयनराजे भोसलेंसारखी होईल असा सांगण्याचा प्रयत्न जितेंद्र आव्हाड करत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ncp Jitendra Awhad Tweet Viral Message On Udyanraje Bhonsale