esakal | अजित पवार मोहिम फत्ते करूनच परतले...
sakal

बोलून बातमी शोधा

Ajit Pawar

दिलेरखानाच्या गोटात छत्रपती संभाजी महाराज गेले नव्हते तर त्यांना पाठवण्यात आलं होते. अगदी तसचं राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांना पाठवण्यात आले होते, पवार मोहिम फत्ते करूनच माघारी परतले आहेत, अशा प्रतिक्रिया सोशल मीडियावर येत आहेत.

अजित पवार मोहिम फत्ते करूनच परतले...

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे: दिलेरखानाच्या गोटात छत्रपती संभाजी महाराज गेले नव्हते तर त्यांना पाठवण्यात आलं होते. अगदी तसचं राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांना पाठवण्यात आले होते, पवार मोहिम फत्ते करूनच माघारी परतले आहेत, अशा प्रतिक्रिया सोशल मीडियावर येत आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसशी बंडखोरी करून अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. या शपथविधीनंतर राजकीय घडामोडींना मोठ्या प्रमाणात वेग आला होता. दोन दिवस उलथापालथ झाल्यानंतर पवार यांनी राजीनामा दिला. पवार यांच्या राजीनाम्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. भारतीय जनता पक्षाचे सरकार कोसळल्यानंतर महाविकास आघाडीचे सरकार स्थापन करण्याचा मार्ग मोकळा झाला. राजकीय घडामोडीनंतर अजित पवार यांनी मंगळवारी (ता. 26) रात्री शरद पवार यांची भेट घेतली. मी, राष्ट्रवादीचा होतो, आहे आणि राहणार हे अजित पवार सांगत होते. अजित पवार पुन्हा स्वगृही परतल्याने पक्षातील कार्यकर्ते त्यांचे स्वागत करू लागले आहेत. दुसरीकडे पक्षातील नेते, कार्यकर्ते त्यांचे आभार मानत आहेत.

सोशल मीडियावर अजित पवार यांनी भाजपसोबत जाणे ही शरद पवार यांची राजकीय खेळी होती. राष्ट्रपती राजवट उठवण्याबरोबरच, भाजप-शिवसेनेची युती तोडली, सरकार स्थापन करण्याचा मार्ग मोकळा झाला. अजित पवार हे मोहिम फत्ते करूनच परतले आहे, अशा प्रतिक्रिया सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागल्या आहेत. नेटिझन्सनी गुगलवर अजित पवार यांनाच सर्वाधिक सर्च केले आहे. या ट्रेण्डवरुन अजित पवार सर्वाधिक चर्चेत राहिल्याचे दिसून येत आहे. गुगलवर  अजित पवार यांच्याबद्दल 43 टक्के, पवारांबद्दल 39 टक्के आणि फडणवीस यांच्याबद्दल 18 टक्के नेटिझन्सनी सर्च केले आहे.