Maharashtra Politics : महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप! अजित पवारांपाठोपाठ शिंदे-फडणवीस राजभवनाकडे रवाना

Ajit Pawar and Devendra Fadnavis
Ajit Pawar and Devendra Fadnavis
Updated on

राज्यात राजकीय घडामोडींना पुन्हा एकदा वेग अला असून देवगिरी बंगल्यावर राष्ट्रवादीच्या आमदारांची बैठक झाल्यानंतर अजित पवार हे राजभवनात दाखल झाले आहेत. देवगिरी बंगल्यावरील बैठकीतून राष्ट्रवादीच्या कार्याध्यक्ष सुप्रिया सुळे, प्रुफल्ल पटेल हे बैठकीतून बाहेर पडले होते. यानंतर आता आजित पवार राष्ट्रवादीच्या आमदारांसह सरकारला पाठिंबा देणार असून ते उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार असल्याची माहिती समोर आली आहे.

अजित पवार यांच्यासोबत राष्ट्रवादीचा मोठा गट फुटल्याची माहिती सुत्रांनी दिली असून छगन भुजबळ हे देखील अजित पवार यांच्यासोबत कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतील. दरम्यान एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हे देखील राजभवनाकडे रवाना झाले असल्याची माहिती मिळत आहे. साम टीव्हीने याबद्दलचे वृत्त दिले आहे.

Ajit Pawar and Devendra Fadnavis
Sharad Pawar : मुंबईतील बैठकीविषयी मला माहिती नाही; अजित पवारांच्या बैठकीबाबत शरद पवारांनी स्पष्ट केली भूमिका

दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याच्या पाठोपाठ उद्य सामंत, शंभूराज देसाई यांच्यासह शिवसेनेचे सर्व प्रमुख नेते राजभवनाकडे रवाना झाले आहेत.

मागील काही दिवसांपासून अजित पवार नाराज असल्याची चर्चा होती. अजित पवारांनी जाहिररित्या पक्षामध्ये जबाबदारी मिळावी अशी मागणी केली होती. यासाठी त्यांनी १ जुलैचा अल्टिमेटम देखील दिला होता. मात्र त्यांच्या या मागणीची दखल न घेतल्याने अजित पवारांनी हा निर्णय घेतल्याचे मानले जात आहे.

Ajit Pawar and Devendra Fadnavis
Ajit Pawar: सेनेनंतर राष्ट्रवादीतही फूट, अजित पवार सरकारमध्ये होणार सामील

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

First full size statue of Ajit Pawar in Baramati
The contribution was highlighted during a birth anniversary programme, where speakers recalled his role in power infrastructure and irrigation development.
During the Janseva Saptah inauguration in Manchar, leaders highlighted Ajit Pawar's role in irrigation, healthcare, education and infrastructure projects.
Ajit Pawar
Marathi News Esakal
www.esakal.com