अजित पवार राजीनाम्यावर ठाम; मनधरणी सुरु

संजय मिस्कीन
Saturday, 28 September 2019

शरद पवार यांचे त्यांना समजाविण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. कुटुंबातील सर्व सदस्यांकडून अजित पवार यांची मनधरणी करण्यात येत आहे. लवकरच अजित पवार त्यांच्या निर्णयाबाबत पुन्हा एकदा विचारविनिमय करतील, अशी सूत्रांची माहिती आहे.

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी संपर्क करून अजित पवार आपल्या राजीनाम्यावर ठाम असल्याची माहिती मिळत आहे. त्यांची मनधरणी करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. ईडीचा जो गलिछ्छ प्रकार सुरु आहे. त्या क्लेषातून राजकारणातूनच निव़ृत्त होण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. ते कोणत्याही परिस्थितीत मागे फिरण्यास तुर्तास तरी तयार नसल्याची माहिती मिळत आहे. शरद पवार यांचा अजित पवारांना अल्टिमेटम दिला असून, दुपारी 3 वाजेपर्यंत अंतिम निर्णय कळवण्याचा संदेश दिला आहे.

अजित पवारांसोबत फक्त सुनिल तटकरे; शिष्टाईचे जोरदार प्रयत्न 

शरद पवार यांचे त्यांना समजाविण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. कुटुंबातील सर्व सदस्यांकडून अजित पवार यांची मनधरणी करण्यात येत आहे. लवकरच अजित पवार त्यांच्या निर्णयाबाबत पुन्हा एकदा विचारविनिमय करतील, अशी सूत्रांची माहिती आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस लागली कामाला; शरद पवारांच्या आज मुंबईत बैठका

दरम्यान, एक ऑक्टोबरपासून शरद पवार यांनी राज्यव्यापी दौरा निश्चित केला आहे. या दौऱ्यात त्यांच्यासोबत राष्ट्रवादीचे प्रमुख नेते आणि त्या-त्या मतदारसंघातील उमेदवार राहणार आहेत. दोन दिवसांत राष्ट्रवादीच्या सर्व उमेदवारांची यादी जाहीर करण्यात येणार आहे. काँग्रेसच्या सोबतचा आघाडीचा संयुक्त जाहीरनामा प्रकाशित करण्याची चर्चा देखील पूर्ण झाली आहे. त्यामुळे आता शरद पवार पुन्हा एकदा प्रचारात सक्रीय होणार हे निश्चित आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: NCP leader Ajit Pawar to quit politics final decision Sharad Pawar discussion