सचिन अहिरांच्या शिवसेना प्रवेशावर अजित पवार म्हणाले...

वृत्तसंस्था
गुरुवार, 25 जुलै 2019

सचिन अहिर यांच्या शिवसेना प्रवेशाबाबत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील जास्त सांगू शकतील. अहिर आणि जयंत पाटील निकटवर्तीय आहेत.

मुंबई : राष्ट्रवादीचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. काही लोकांना आमदार न झाल्यास राजकारणच करता येत नाही, त्यामुळे ते असा निर्णय घेतात, असे पवार यांनी म्हटले आहे.

सचिन अहिर यांनी आज (गुरुवार) हातातील राष्ट्रवादीचे घड्याळ काढून शिवसेनेचे शिवबंधन बांधले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत त्यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. सचिन अहिर भायखळ्यातून विधानसभा निवडणूक लढविण्याची शक्यता आहे.

याविषयी बोलताना अजित पवार म्हणाले, की सचिन अहिर यांच्या शिवसेना प्रवेशाबाबत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील जास्त सांगू शकतील. अहिर आणि जयंत पाटील निकटवर्तीय आहेत.

सचिन अहिर यांच्या शिवसेना प्रवेशानंतर राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी शायरीतून प्रतिक्रिया दिली आहे. 
जो जिंदा होते हैं वह प्रवाह के विरूद्ध तैरते हैं,
मुर्दा लोग पानी के साथ बह जाते हैं।
साथियों जिंदा हो तो जिंदा नज़र आना ज़रूरी है।
जयहिंद जय राष्ट्रवाद।


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: NCP leader Ajit Pawar reaction on Sachin Ahir enters Shivsena