Vidhan Sabha 2019 : नव्या दमाने अजित पवार राजकारणात पुन्हा सक्रिय (व्हिडिओ)

टीम ई-सकाळ
Sunday, 29 September 2019

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी आपल्या विधानसभा सदस्यत्त्वाचा राजीनामा दिला. त्यानंतर राज्यात एकप्रकारचा राजकीय भूंकपच झाल्याचे पाहिला मिळाले.

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी आपल्या विधानसभा सदस्यत्त्वाचा राजीनामा दिला. त्यानंतर राज्यात एकप्रकारचा राजकीय भूंकपच झाल्याचे पाहिला मिळाले. अजित पवार हे राजकारणातून संन्यास घेणार अशी चर्चाही सुरु होती. मात्र, आता अजित पवार यांचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. यामध्ये ते राजकारणात पुन्हा सक्रीय झाल्याचे दिसत आहे.

अजित पवार यांनी आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर काही तासांतच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेत यावर बाजू मांडली. यावेळी त्यांनी अजित पवार यांच्या राजकारणातील परिस्थितीविषयी भाष्य केले होते. त्यानंतर अजित पवार हे राजकीय संन्यास घेणार असल्याचे सांगितले जात होते. याबाबतच्या चर्चाही सुरु होत्या. या सर्व घडामोडीनंतर अजित पवार यांनी काल (शनिवार) पत्रकार परिषद घेऊन आपली बाजू मांडत राजीनाम्याचे कारणही सांगितले.

दरम्यान, आता अजित पवार यांचा एका नवा व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये ते घटस्थापनेनिमित्त महिलांना शुभेच्छा देत आहेत. महिलांचा मान-सन्मान राखणे. त्यांचा जागर करणे ही समाजाची परंपरा आहे. महिलांचा मी आदर करतो. 

Vidhan Sabha 2019 : आता 'या' तारखेला होणार नारायण राणेंचा भाजपप्रवेश


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: NCP Leader Ajit Pawar reactivated again in politics Maharashtra Vidhan Sabha 2019