अजित पवार यांच्या राजीनाम्यावर बागडे म्हणाले...

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 27 सप्टेंबर 2019

राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी माझ्याकडे आज (शुक्रवार) आमदारकीचा राजीनामा दिला आहे.

मुंबईः राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी माझ्याकडे आज (शुक्रवार) आमदारकीचा राजीनामा दिला आहे. पण, राजीनामा का दिला याबाबत त्यांनी कोणतेही कारण दिले नाही, असे विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी सांगितले.

हरिभाऊ बागडे हे औरंगाबाद येथे होते. बागडे यांच्याकडे आमदारकीचा राजीनामा दिला. परंतु, राजीनामा का दिला याबाबत कोणतेही कारण दिले नाही. पवार यांचा राजीनामा मंजूर केला आहे. पवार यांच्या राजीनाम्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधान आले आहे. बागडे म्हणाले, राजीनामाच्या अर्जावर कोणतेही कारण दिलेले नाही. त्यावर फक्त राजीनामा देत असल्याचे म्हटले आहे. शिवाय, पवार यांनी फोन करूनही राजीनामा देत असल्याचे सांगितले.

दरम्यान, अजित पवार सध्या बारामती विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत होते. महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेतील कथित गैरव्यवहारप्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) राज्यातील 70 नेत्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता. त्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह अजित पवार आणि इतरांचा समावेश होता. दरम्यान, शरद पवार यांचे पुतणे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेते अजित पवार यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला आहे. मिळालेल्या माहितीनुसार अजित पवार यांनी त्यांनी ई-मेलद्वारे राजीनामा दिल्याची माहिती आहे. ‘आजपासून मी माझ्या आमदारकीचा राजीनामा देत आहे,’ अशा आशयाचा एका ओळीचा राजीनामा ई-मेल अजित पवार यांनी बागडे यांच्याकडे सुपूर्द केला. त्यावर बागडे यांनी राजीनामा मंजूरही केला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ncp leader ajit pawar resigns mla says haribhau bagde