सावरकरांचे योगदान नाकारून चालणार नाही : अजित पवार

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 26 February 2020

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या योगदानावरून काँग्रेसने वारंवार टीका केली होती. राहुल गांधी यांनीही अतिशय आक्रमक भाषेत सावरकरांना माफीवीर असे म्हटले होते. आज (26 फेब्रुवारी) सावरकारांची पुण्यतिथी आहे.

मुंबई : महापुरुषांच्या कामावरून वाद होऊ नये. स्वातंत्र्यवीर सावरकरांचं अनेक क्षेत्रातलं योगदान हे नाकारून चालणार नाही. उगाच त्यावरून वाद निर्माण करू नये, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे.

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या योगदानावरून काँग्रेसने वारंवार टीका केली होती. राहुल गांधी यांनीही अतिशय आक्रमक भाषेत सावरकरांना माफीवीर असे म्हटले होते. आज (26 फेब्रुवारी) सावरकारांची पुण्यतिथी आहे. त्यानिमित्त भाजपने विधिमंडळाच्या परिसरात सावरकरांची प्रतिमा लावून त्यांना आदरांजली अर्पण केली. काँग्रेसचे ज्येष्ठ मंत्री बाळासाहेब थोरात यांनीही आशिष शेलार यांच्या इशाऱ्यावरून सावरकरांना आदरांजली वाहिली. भाजप आमदार भगव्या टोप्या घालून सभागृहात उपस्थित होते.

अजित पवार यांनी म्हटले आहे, की सावरकरांविषयी उगाच वाद निर्माण करून समाजात गैरसमज पसरविण्याचा काही लोक प्रयत्न करत आहेत. सावरकरांचे समाजातील योगदान नाकारून चालणार नाही. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: NCP leader Ajit Pawar talked about Veer Savarkar