Eknath Khadse : जो माणूस बायकोला साधी साडी...खडसेंची शहाजीबापू पाटलांवर टीका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Eknath Khadse

Eknath Khadse : जो माणूस बायकोला साधी साडी...खडसेंची शहाजीबापू पाटलांवर टीका

काय झाडी, काय डोंगर, काय हाटेल...या डॉयलॉगमुळे प्रसिद्ध झालेले शिंदे गटाचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी एका मुलाखतीदरम्यान, गरिबीमुळे बायकोला साडी घ्यायला जमली नाही, असे म्हटले होते. हाच मुद्दा पकडत राष्ट्रवादी नेते एकनाथ खडसे यांनी टोलेबाजी केली आहे. (NCP Leader Eknath Khadse Critizsize To Shahajibapu Patil maharashtra politics )

माध्यमांशी संवाद साधताना एकनाथ खडसे यांनी शहाजीबापू पाटलांवर निशाणा साधला आहे. शहाजीबापूंनी त्यांची पूर्वीची स्थिती सांगताना म्हटले की, त्यावेळी शरद पवारांनी माझ्याकडे लक्ष दिले नाही. बायकोलाही साडी घ्यायला पैसे नव्हते. कदाचित गंमतीने शहाजीबापूंनी ते विधान केले असेल, किंवा उद्वेगातून केले असेल. पण आपल्या बायकोलाही साडी घेऊ शकत नसेल तर तो मर्द कसला, असा सवाल करत हे कोणत्या हेतूने म्हटले ते मला माहिती नाही.

पण आता शहाजी बापूंची परिस्थिती आमदार झाल्यापासून सुधारली. त्यामुळे आता त्यांना कोणाकडे आशेने बघण्याची आवश्यकता नाही, असा टोलाही एकनाथ खडसे यांनी लगावला.

शहाजीबापू पाटील नेमकं काय म्हणाले?

१९ वर्ष सातत्याने घरात गरीबी होती. परंतु मी जनतेचे प्रश्न सोडवण्यात कुठेही कमी पडलो नाही. मात्र माझ्या गरिबीच्या काळात मी पक्षाचा कार्यकर्ता असूनही शरद पवार आणि अजित पवार हे माझ्यासोबत नव्हते याचे शल्य मला आयुष्यभर बोचत राहील, असे शहाजीबापू पाटील यांनी म्हटले होते.

गुवाहाटीत असताना एका कार्यकर्त्याशी संवाद साधताना, माझ्या बायकोला साधी एक साडी घेणे शक्य झाले नाही, असे म्हटले होते. यानंतर राष्ट्रवादीच्यावतीने शहाजीबापू पाटील यांच्या पत्नीला एक साडी भेट पाठवण्यात आली होती. यावर बोलताना, मी ती साडी घेतली नाही, कारण माझी जेव्हा हलाकीची परिस्थिती होती तेव्हा कुणीही माझ्यासोबत नव्हते, असे शहाजीबापू पाटील यांनी सांगितले.