Gopichand Padalkar: राष्ट्रवादी हा पक्ष नसून ती टोळी; गोपीचंद पडळकरांचा अजित पवारांवर घणाघात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ajit pawar vs Gopichand Padalkar

Gopichand Padalkar: राष्ट्रवादी हा पक्ष नसून ती टोळी; गोपीचंद पडळकरांचा अजित पवारांवर घणाघात

Ajit pawar vs Gopichand Padalkar: भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादी याच्यातीव वाद पुन्हा उफाळून आला आहे. गोपीचंद पडळकर यांनी अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीवर जोरदार टीका केली आहे. ते आज सांगलीतील विटा या ठिकाणी प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

हेही वाचा: Gujarat: राज्याला आणखी एक धक्का; उद्योगांपाठोपाठ आता प्राणीदेखील गुजरातला रवाना

या वेळी त्यांनी अजित पवार यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रस पक्ष नसून ती एक टोळी असल्याचा उल्लेख केला. ते म्हणाले "राष्ट्रवादीच्या स्थापने पासून पक्षाला एकच राष्ट्रीय अध्यक्ष आहेत आज पर्यंत ते बदलले नाहीत.

हेही वाचा: उद्धव ठाकरेंनी मातोश्रीचे दरवाजे माझ्यासाठी बंद केले, फडणवीसांनी बोलून दाखवली खंत

राष्ट्रवादीला कोणत्याही प्रकारचा अजेंडा नाही. मुळात राष्ट्रवादी हा पक्ष नसून एक टोळी आहे. हा पक्ष फुटणार नाही, तर आज ना उद्या संपेल. असा टोला लगावला.

तर अजित पवार यांनी बारामती मतदार संघातील दुष्काळी गावांकडे लक्ष द्यावे, असा सल्लाही यावेळी त्यांनी दिला. अजित पवार यांना बारामतीमधील लोक लाखाच्या फरकानं निवडून देतात. त्यामुळेच बारामती मधील ४४ गावं आजही पाण्यासाठी वणवण भटकतात.

तर अजित पवार यांनी आपल्याकडे मंत्री पदं असताना काय केले याचा एकदा विचार करावा अशी टीका पडळकर यांनी केली.

टॅग्स :Ajit PawarNCPncp chief