उद्धव ठाकरेंनी मातोश्रीचे दरवाजे माझ्यासाठी बंद केले, फडणवीसांनी बोलून दाखवली खंत | Devendra Fadnavis on Uddhav Thackeray | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Devendra Fadnavis on Uddhav Thackeray

उद्धव ठाकरेंनी मातोश्रीचे दरवाजे माझ्यासाठी बंद केले, फडणवीसांनी बोलून दाखवली खंत

 Devendra Fadnavis on Uddhav Thackeray: राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी घडत आहेत. विरोधी सत्ताधारी नेते एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना दिसून येतात. अशातच सत्ताधारी भाजपकडून विरोधी नेत्यांवर ईडीची चौकशी लावत असल्याचे आरोप सातत्याने होत असतात.

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारच्या काळामध्ये मला जेलमध्ये टाकण्याचं टार्गेट त्यावेळचे मुंबई सीपी संजय पांडे यांना दिलं होतं म्हणतं मोठा गौप्यस्फोट केला आहे.

हेही वाचा: Gujarat: राज्याला आणखी एक धक्का; उद्योगांपाठोपाठ आता प्राणीदेखील गुजरातला रवाना

त्याच बरोबर फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका देखील केली. ते म्हणाले २०१४ आणि २०१९ च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींचे फोटो लावून निवडून आले आहेत.

निवडणुकीच्या काळात शिवसेनेच्या अनेक उमेदवारांनी उद्धव ठाकरेंचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मोठा फोटो आणि बाळासाहेबांचा लहान फोटो लावून मतं मागितली.

हेही वाचा: फडणवीसांच्या आरोपाचं माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांकडून खंडण

उद्धव ठाकरे यांच्यासोबत माझं कोणतेही वैर नाही. उद्धवजीनी माझ्यासाठी मातोश्रीचे दरवाजे बंद केले. आपण एकत्र सरकार चालवतो, एकत्र काम करतो. माझा फोनही उद्धव ठाकरेंनी घेतला नाही. साधा फोन करून तरी सांगायला पाहिजे होत आम्हाला तुमच्यासोबत यायचं नाही. अशी खंत ही त्यांनी बोलून दाखवली.