BJP : तेव्हा भाजप पुन्हा राजकीय भूकंप करणार; पाटलांच्या विधानानं भुवया उंचावल्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Eknath Shinde On Devendra Fadnavis

BJP : तेव्हा भाजप पुन्हा राजकीय भूकंप करणार; पाटलांच्या विधानानं भुवया उंचावल्या

Jayant Patil On Shinde Fadanvis Government : बंडखोरीनंतर सत्तेत आलेल्या शिंदे-फडणवीस यांनी एकत्र येत राज्यात सत्ता स्थापने केली. अनेकांनी हे सरकार संविधानिक नसल्याची टीका केली आहे. या सर्व आरोपप्रत्यारोपांमध्ये राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी सध्याच्या सरकारबाबत काही भविष्यवाणी केली आहे. त्यांच्या या भविष्यवाणीमुळे राज्यातील शिंदे-भाजपचं सरकार किती काळ टिकणार याबाबत चर्चा सुरू झाली आहे. ते औरंगाबादमध्ये माध्यमांशी बोलत होते.

हेही वाचा: Shivsena : कदमांना वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये पाठवा; शिवसेना नेत्याची जीभ घसरली

जयंत पाटील म्हणाले की, हे सरकार कार्यकाळ पूर्ण करणार नसून, भाजपचं उदिष्ट साध्य झाले की, ते सरकार पाडतील आणि त्यानंतर शिंदे यांना चूक झाल्याचं कळेल. मुख्यमंत्री शिंदे भाषण लिहून दिल्यावरच बोललात, वाचून दाखवतात ते भाषण गुलामगिरीमध्ये असल्याचा आरोपदेखील पाटील यांनी केला आहे. शिंदे जसे काम करताय त्यावर निश्चितपणे फडणवीस नाराज आहेत आणि त्यांनी सावधसुद्धा राहावे असा सल्ला पाटील यांनी फडणवीसांना दिला आहे.

हेही वाचा: Maharashtra : जावयाला सांभाळायचे म्हटल्यावर...; शिंदेंच्या विधानानंतर चर्चांना उधाण

निवडणुका एकत्र लढणार का?

दरम्यान, येत्या काळात होणाऱ्या जिल्हा परिषद, महापालिकेच्या निवडणुका काँग्रेस, शिवसेनेसोबत आघाडी करण्याबाबतही पाटील यांनी विधान केले आहे. ते म्हणाले की, स्थानिक नेत्यांना इतर पक्षातील स्थानिक नेत्यांशी चर्चा करण्यास सांगण्यात आले आहे. त्यांच्याशी काही जुळले तरच काही विचार होऊ शकतो, असे सूचक विधान पाटील यांनी केले आहे.

Web Title: Ncp Leader Jayant Patil Big Statement On Shinde Fadanvis Government Maharashtra Political Crises

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..