
मुंबई- राष्ट्रपीता महात्मा गांधी यांची आज जयंती आहे. देशभरात महात्मा गांधींची जयंती उत्सहात साजरी केली जात आहे. पण, काही वर्ग महात्मा गांधी यांची हत्या करणाऱ्या नथुराम गोडसेचा उदोउगो करत आहेत. यासंदर्भात नथुराम गोडसेला अभिवादन केले जात आहे. याच पार्श्वभूमीवर एका महिलेने केलेल्या 'एक्स'वरील पोस्टवर राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
महिलेने एक्सवर पोस्ट करुन नथुराम गोडसेला अभिवादन केलंय. 'महिला म्हणाली की, अहिंसेच्या शस्त्राला हिंसेच्या अमोघ शस्त्राने घोडा लावणाऱ्या पंडित नथुराम गोडसे यांना त्रिवार अभिवादन.' महिलेची ही पोस्ट शेअर करत जितेंद्र आव्हाड म्हणाले की, 'ह्या भगिनी कोण आहेत. घोडा लावला … हे शब्द…. ताई जरा जपून.'
महात्मा गांधींच्या जयंतीदिवशी काही वर्ग राष्ट्रपीत्यावर टीका करताना दिसत आहे. निशस्त्र आणि अहिंसेचा पुरस्कार करणाऱ्या महात्मा गांधी यांच्यावर गोळी चालवणाऱ्या भ्याड नथुराम गोडसेचा गोरवोद्गार काहीजण करत आहेत. महात्मा गांधींच्या जयंती आणि पुण्यतिथी दिवशी असे कृत्य आता सर्रासपणे घडताना दिसत आहे.
मागे काही समाजकंटकांनी महात्मा गांधींच्या प्रतिमेचा अवमान केल्याची घटना घडली होती. अशा लोकांवर कडक कारवाई करण्याची मागणी होत आहे. दरम्यान, महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त राजकीय नेत्यांनी त्यांना अभिवादन केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना अभिवादन करतान म्हटलं की, महात्मा गांधींनी दाखवलेला मार्ग येणाऱ्या प्रत्येक पिढीसाठी मार्गदशक आहे. (Latest Marathi News)