भाजप सरकारने ओबीसींचे आरक्षण संपविले : आव्हाड (व्हिडिओ)

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 3 ऑगस्ट 2019

रथयात्रेच्या माध्यमातून देशात द्वेषाचं राजकारण पेटवलं गेले. ओबीसी, मागासवर्गीयांनी आता जागे होऊन या सरकारला विरोध करा अन्यथा आपले आरक्षण संपून जाईल, असे आव्हाड यांनी म्हटले आहे.

मुंबई : भाजप सरकार हे आरक्षण विरोधी सरकार असून या सरकारने पद्धतशीरपणे ओबीसींचे आरक्षण संपवण्याचा डाव रचला असल्याचा आरोप आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.

1990 साली मंडल आयोगाने शिफारस केलेले आरक्षण शरद पवार यांनी लागू केले. यामुळे इथल्या ओबीसी जातीमधील अनेक लोकं निवडणुकीत जिंकून आले.नगरसेवक, महापौर झाले. मात्र, भाजप सरकारने हे आरक्षण कमी करून ओबीसींवर अन्याय केला आहे. याची सुरुवात 1990 साली लालकृष्ण अडवाणी यांनी मंडल आयोगाच्या विरोधात रथयात्रा काढून केली होती.

रथयात्रेच्या माध्यमातून देशात द्वेषाचं राजकारण पेटवलं गेले. ओबीसी, मागासवर्गीयांनी आता जागे होऊन या सरकारला विरोध करा अन्यथा आपले आरक्षण संपून जाईल, असे आव्हाड यांनी म्हटले आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: NCP leader Jitendra awhad targets BJP government on OBC Reservation